"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४१: ओळ ४१:
[[इ.स. १९९३]] नंतर चार वर्षांनी थेट काँग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची त्यांनी निवडणूक आयोगाच्या दरबारी नोंदणी केली आणि [[इ.स. १९९८]] मध्ये 'तृणमूल काँग्रेस' हा पक्ष अवतरला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर [[इ.स. १९९८]] ते [[इ.स. २००१]] या कालावधीत त्यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तर [[इ.स. २००१]] च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. [[इ.स. १९९१]] ते [[इ.स. २००१]] या कालावधीत दोनदा, आणि [[इ.स. २००४]] मध्ये काही काळ त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला... लोकसभेत त्या तृणमूलच्या एकमेव खासदार होत्या. [[इ.स. २००५]] मधील कोलकाता महापालिका निवडणुकीतही तृणमूलचे पानिपत झालं होते. अशा अपयशांचा सामना करतानाही पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता उलथून टाकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही.
[[इ.स. १९९३]] नंतर चार वर्षांनी थेट काँग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची त्यांनी निवडणूक आयोगाच्या दरबारी नोंदणी केली आणि [[इ.स. १९९८]] मध्ये 'तृणमूल काँग्रेस' हा पक्ष अवतरला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर [[इ.स. १९९८]] ते [[इ.स. २००१]] या कालावधीत त्यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तर [[इ.स. २००१]] च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. [[इ.स. १९९१]] ते [[इ.स. २००१]] या कालावधीत दोनदा, आणि [[इ.स. २००४]] मध्ये काही काळ त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला... लोकसभेत त्या तृणमूलच्या एकमेव खासदार होत्या. [[इ.स. २००५]] मधील कोलकाता महापालिका निवडणुकीतही तृणमूलचे पानिपत झालं होते. अशा अपयशांचा सामना करतानाही पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता उलथून टाकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही.


[[इ.स. २००६]] ते [[इ. स. २०११]] हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. [[इ.स. २००६]] च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत [[सिंगूर]] येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटाने आंदोलन केले. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर [[इ. स. २००८]] मध्ये टाटांनी सिंगूरमधून माघार घेतली. शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेले. तर पोलिसी बळाच्या अतिवापराने डाव्यांना लोकांपासून तोडले. त्यानंतर [[पंचायत]], [[महापालिका]], [[विधानसभा]], [[लोकसभा]], यांच्या पोटनिवडणुकींत ममतांना वाढते यश मिळत गेले. [[इ. स. २००९]] मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.
[[इ.स. २००६]] ते [[इ. स. २०११]] हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. [[इ.स. २००६]] च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत [[सिंगूर]] येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटाने आंदोलन केले. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर [[इ.स. २००८]] मध्ये टाटांनी सिंगूरमधून माघार घेतली. शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेले. तर पोलिसी बळाच्या अतिवापराने डाव्यांना लोकांपासून तोडले. त्यानंतर [[पंचायत]], [[महापालिका]], [[विधानसभा]], [[लोकसभा]], यांच्या पोटनिवडणुकींत ममतांना वाढते यश मिळत गेले. [[इ. स. २००९]] मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.


===२०११ ची विधानसभा निवडणूक===
===२०११ ची विधानसभा निवडणूक===

२२:०७, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

ममता बॅनर्जी
टोपणनाव: ममता बॅनर्जी
संघटना: तृणमूल काँग्रेस
धर्म: हिंदू


ममता बॅनर्जी (जन्म ५ जानेवारी १९५५) या पश्चिम बंगाल राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेस या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषविलेले आहे. मे २०११ मधल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगालमधील डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पक्षाची ३४ वर्षांची राजवट संपुष्टात आणून सत्ता हस्तगत केली. आपल्या जहाल वक्तृत्वाने लोकप्रिय असलेल्या ममता बॅनर्जी त्यांच्या समर्थकांमध्ये दिदी (थोरली बहिण) या नावाने ओळखल्या जातात

बालपण

ममता बॅनर्जी ही एका स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे. लहानपणापासूनच त्यांच्यातली विजिगीषुवृत्ती दिसून आली होती. ममता लहान असतानाच त्यांचे वडील गेले. घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी दूध विकायचे काम केले. पेन्टिंग, वाचन हे छंद जोपासत त्या एम्‌.ए. बी.एड्‌. एल्‌एल्‌बी झाल्या. इ.स. १९७० मध्ये युवक काँग्रेसच्या 'छात्र परिषदे'मधून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. इ.स. १९८४ पर्यंत पश्चिम बंगालबाहेर त्यांना फारसे कुणी ओळखत नव्हते.

राजकीय कारकीर्द

ममता मुळातच लढवय्या स्वभावाच्या होत्या. इ.स. १९८४ मध्ये २९ व्या वर्षी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या दिग्गजाला हरवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. मात्र, इ.स. १९८९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजीव गांधींनी त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले. इ.स. १९९१ मध्ये त्या दक्षिण कोलकता मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आणि या मतदारसंघाला त्यांनी विजयगड बनवले. नंतर सलग पाच निवडणुकांत त्या येथून वाढत्या फरकाने विजयी होत गेल्या. इ.स. १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. मात्र सरकारशी झालेल्या मतभेदानंतर इ.स. १९९३ मध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले.

तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना

इ.स. १९९३ नंतर चार वर्षांनी थेट काँग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची त्यांनी निवडणूक आयोगाच्या दरबारी नोंदणी केली आणि इ.स. १९९८ मध्ये 'तृणमूल काँग्रेस' हा पक्ष अवतरला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर इ.स. १९९८ ते इ.स. २००१ या कालावधीत त्यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तर इ.स. २००१ च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. इ.स. १९९१ ते इ.स. २००१ या कालावधीत दोनदा, आणि इ.स. २००४ मध्ये काही काळ त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला... लोकसभेत त्या तृणमूलच्या एकमेव खासदार होत्या. इ.स. २००५ मधील कोलकाता महापालिका निवडणुकीतही तृणमूलचे पानिपत झालं होते. अशा अपयशांचा सामना करतानाही पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता उलथून टाकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही.

इ.स. २००६ ते इ. स. २०११ हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. इ.स. २००६ च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत सिंगूर येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटाने आंदोलन केले. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर इ.स. २००८ मध्ये टाटांनी सिंगूरमधून माघार घेतली. शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेले. तर पोलिसी बळाच्या अतिवापराने डाव्यांना लोकांपासून तोडले. त्यानंतर पंचायत, महापालिका, विधानसभा, लोकसभा, यांच्या पोटनिवडणुकींत ममतांना वाढते यश मिळत गेले. इ. स. २००९ मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.

२०११ ची विधानसभा निवडणूक

कविमनाच्या ममतादीदींनी या निवडणुकीसाठी "मां माटी, माणूश' आणि "बदला नही बदलाव चाहिये' अशा दोन घोषणा स्वतः तयार केल्या. या घोषणांची जनमताचा ठाव घेतला. प्रत्येक सभेत त्या जणू दुर्गेचेच रूप धारण करीत. डाव्या नेत्यांवर त्या त्वेषाने तुटून पडत. एक महिला डाव्यांना आव्हान देते याचे सामान्यांना मोठे अप्रूप वाटे. केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक एक-दीड किलोमीटर दुतर्फा गर्दी करीत. ज्योती बसू यांच्यानंतर सामान्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या, त्यांची नस ओळखणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. 'मां, माटी, माणूश...' या घोषणेने सामान्य बंगालींना आपलसे करत ममता बॅनर्जीनी ३४ वर्षांची पश्चिम बंगालमधली कम्युनिस्टांची 'लालसत्ता' उलथून डाव्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चारीमुंड्या चीत केले. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय पटलावर त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करत केंदीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली. दिल्लीत जाऊनही बंगालशी असलेली नाळ त्यांनी कायम राखली. कॉटनची पांढरी सुती कमी किमतीची साडी व खांद्याला शबनम बॆग लावून जनतेत मिसळणार्‍या ममता बॅनर्जी कोलकात्याच्या कालीघाट परिसरातील पूर्वीच्याच छोट्या घरात रहातात. अशा साधेपणातून ममतांनी बंगालच्या सामान्य माणसांशी स्वत:ला जोडून ठेवले.