"केसरबाई केरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
}}
}}
''सूरश्री'' '''केसरबाई केरकर''' ([[जुलै १३]], [[इ.स. १८९२]] - [[सप्टेंबर १६]], [[इ.स. १९७७]]) या [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील [[जयपूर-अत्रौली घराणे|जयपूर-अत्रौली घराण्याच्या]] शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.
''सूरश्री'' '''केसरबाई केरकर''' ([[जुलै १३]], [[इ.स. १८९२]] - [[सप्टेंबर १६]], [[इ.स. १९७७]]) या [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील [[जयपूर-अत्रौली घराणे|जयपूर-अत्रौली घराण्याच्या]] शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.


== जीवन ==
== जीवन ==

०८:२८, २३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

केसरबाई केरकर
आयुष्य
जन्म जुलै १३, इ.स. १८९२
जन्म स्थान केरी, गोवा, भारत
मृत्यू सप्टेंबर १६, इ.स. १९७७
मृत्यूचे कारण वृद्धापकाळ
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू उस्ताद अब्दुल करीम खाँ
रामकृष्णबुवा वझे
उस्ताद अल्लादिया खाँ
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे जयपूर घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार, इ.स. १९६९
राज्य गायिका पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, इ.स. १९६९
संगीत नाटक अकादमी पुरस्कार

सूरश्री केसरबाई केरकर (जुलै १३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १६, इ.स. १९७७) या हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.

जीवन

गोव्याच्या उत्तर भागातील फोंडा तालुक्यातील केरी नामक खेड्यात गोमंतक मराठा समाजात केसरबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कोल्हापुरास प्रयाण करून आठ महिने उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. गोव्याला परत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे (इ.स. १८७१ -इ.स. १९४५) यांच्याकडे आपले संगीत शिक्षण चालू ठेवले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत स्थलांतर केले व तिथे अनेक संगीतगुरूंकडून त्या प्रशिक्षण घेत राहिल्या. सरतेशेवटी इ.स. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ (इ.स. १८५५ - १९४६) यांचे शिष्यत्व पत्करले.

सांगीतिक कारकीर्द

केसरबाईंच्या गायनाची कीर्ती लवकरच चहूं दिशांना पसरली. त्या राजे - सरदार मंडळींसाठीही नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते. कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने इ. स. १९४८ साली केसरबाईंना 'सूरश्री अशी पदवी बहाल केली.

पुरस्कार

  • पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार, इ.स. १९६९.
  • राज्य गायिका पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, इ.स. १९६९.

वारसा

केसरबाईंच्या जन्मगावी ज्या घरी त्यांचे बालपण गेले, तिथे आता सूरश्री केसरबाई केरकर हायस्कुलाची इमारत आहे. त्यांचा जन्म जिथे झाला, ते त्यांचे पूर्वीचे घर तिथून थोड्याच अंतरावर आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.