"वर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २२: ओळ २२:
===उच्चारात वापरले जाणारे अवयव===
===उच्चारात वापरले जाणारे अवयव===
* पडजीभ (velum)
* पडजीभ (velum)
* टाळू (palate)
* टाळू (palate)
* नाकातील पोकळी (nasal cavity)
* नाकातील पोकळी (nasal cavity)
* ओठ
* ओठ

०८:४७, १६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

वर्ण: तोंडा वाटे निघणार्‍या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर(नाश न पावणारे) असेही म्हणतात.

वर्णमाला

मराठी वर्णमाला खालील प्रमाणे आहे:

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, ॠ व लृ

क्, ख्, ग्, घ्, ङ् च्, छ्, ज्, झ्, ञ् ट्, ठ्, ड्, ढ्, ण् त्, थ्, द्, ध्, न् प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्

स्, श्, ष्, ह्

ळ्

वर्णमाला उच्चार

आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना नेमके काय होते? आपल्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.

उच्चारात वापरले जाणारे अवयव

  • पडजीभ (velum)
  • टाळू (palate)
  • नाकातील पोकळी (nasal cavity)
  • ओठ
  • दात
  • जिभेचे टोक
  • जिभेचा मधला भाग
  • जिभेची मागची बाजू

इत्यादि अवयव तर वापरले जातातच.

  • पण पडजीभेच्या मागचा भाग (uvula )हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़ वगैरे.

या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.

व्यंजने व त्यांचे विभाजन

वर उल्लेखिलेले उच्चारक वापरून वेगवेगळे उच्चार केले जाता. एखादा उच्चार करण्यासाठी कोणते दोन उच्चारक वापरले आहेत, हे पाहून त्यानुसार ५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

  • कण्ठ्य - पडजीभ व जीभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे वर्ण- जसे क्,ख्, ग्, घ्, ङ्
  • तालव्य - टाळू व जीभ यांचा एकमेकांशी स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण- जसे च्, छ्, ज्, झ्, ञ्, श्
  • मूर्धन्य - या प्रकारातही टाळू व जीभ यांचाच एकमेकांना स्पर्श होतो, पण वेगळ्या प्रकारे. तालव्याच्या वेळी आपली जीभ सरळ , समोरच्या दिशेला असते. तर मूर्धन्याच्या वेळी जीभ थोडी आतल्या बाजूच्या दिशेने वळवून घेतली जाते. जसे- ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ष्
  • दन्त्य - दातांना जीभेचा स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण- जसे त्, थ्, द्, ध्, न्,स्
  • ओष्ठ्य - दोन्ही ओठ एकत्र येऊन त्यांचा स्पर्श झाल्यास निर्माण होणारे वर्ण- जसे प्, फ्, ब्, भ्, म्

कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.

न वापरले जाणारे भाग

uvula सारखाच आणखी एक उच्चारकही आपण वापरत नाही तो म्हणजे alveolar ridge. हा उच्चारक तोंडाच्या आतील बाजूस दातांच्या वर आहे.- त्याच्या व जीभेच्या टोकाच्या संयोगातून ट्, ठ्, ड्, ढ् हे इंग्रजी भाषेतले उच्चार निर्माण होतात. हे वर्ण आपल्या ट्, ठ्, ड्, ढ् हून वेगळे आहेत, कारण दोन्ही भाषांत वेगवेगळ्या अवयवांच्या संयोगातून ते निर्माण झाले आहेत. दोन्हीं वर्णगटांचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करून पाहिल्यास, त्यांतला फरक लक्षात येईल.

'श्' व 'ष्' यांत फरक काय

असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. सर्व वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे लक्षात येईल.