"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने बदलले: sa:अन्तरजालम्
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: kk:Internet
ओळ ९३: ओळ ९३:
[[kaa:İnternet]]
[[kaa:İnternet]]
[[kab:Internet]]
[[kab:Internet]]
[[kk:Интернет]]
[[kk:Internet]]
[[km:អ៊ីនធើណែត]]
[[km:អ៊ីនធើណែត]]
[[kn:ಅಂತರ್ಜಾಲ]]
[[kn:ಅಂತರ್ಜಾಲ]]

२०:१३, १२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

महाजाल हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस् चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. (बऱ्याच वर्तमानपत्रे व मासिकांत इंटरनेटला 'महाजाल' हा शब्द वापरलेला आढळतो)

महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतीक प्रमाण अश्या प्रोटोकॉल्स (इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवादपद्धती)वर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्कस् नी बनलेले आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक पत्रे (ई-मेल), वर्ल्डवाईड वेब पेजेस् , लोकांशी गप्पा मारणं (चॅटिंग) इत्यादी.

इंटरनेटच्या स्थापनेची मुले सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली आहेत, जेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे बनविण्याचा ध्यास होता. नवीन अमरीकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊनडेशनने सन १९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीने आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदतीमुळे, जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांबरोबर हात जोडले.

सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचे घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते कि जगातील जवळपास एक चातुर्थ्यांश लोकसंख्या 'महाजालचा' वापर आपल्या दैनिदिन आयुष्यात करते.

इंटरनेट वर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमीत करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धारण निश्चित करत असतो.

हेही पहा