"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५१: ओळ ५१:


जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावाला राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावामध्ये बेल्हेश्वर नावाचे मंदिर आहे. बेल्हे गावचा "बैलांचा बाजार" सबंध पुणे जिल्ह्यत प्रसिद्ध आहे. गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. नावाजलेले [[तमासगीर]] कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याची समाधी बेल्हे गावाजवळील "आळे" या ठिकाणी आहे.
जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावाला राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावामध्ये बेल्हेश्वर नावाचे मंदिर आहे. बेल्हे गावचा "बैलांचा बाजार" सबंध पुणे जिल्ह्यत प्रसिद्ध आहे. गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. नावाजलेले [[तमासगीर]] कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याची समाधी बेल्हे गावाजवळील "आळे" या ठिकाणी आहे.

==खोडद==
खोडद,पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील ४५०० ते ५००० लोकवस्तीचं गाव.पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावाच्या पुर्वेला वसलेला सुंदर गाव.गाव तसं जेमतेम पन सुरेख.
गावठाणाभोवती मिना नदी गावच्या सौंदर्यात भर घालते.गावचं ग्रामदैवत आई मुक्ताई.गावकर्यांचं नितांत श्रधास्थान.मंदिरासमोरील दर्गा गावातील हिंदु-मुस्लिम ऍक्याची साक्ष देतो.त्याचबरोबर गावच्या उत्तरेला एक आनी दक्षिणेला एक अशी २ हनुमान मंदिरे,नदितीरावर एक महादेवाचं आणि एक विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर आहे.विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं वैशिष्ट्य म्हनजे पंढरपुरच्या विठोबास जसा चंद्रभागेचा वळसा आहे तसाच ईथेही मिना नदीचा.सध्या गावठाणामधे एक भव्य राम मंदिर उभं रहात आहे.एकंदरीतच गावकरी भाविक आनी श्रधाळु आहेत.
गावाच्या पुर्वेला एक डोंगर आहे पिरॅमिडच्या आकाराचा-सुळक्या.
पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही.५ कि.मी. अंतरावर एक गाव आहे-मांजरवाडी.खोडद-मांजरवाडी नेहमी हातात हात घालुन चालनारी गावं.जुने रुनानुबंध आहेत.
दक्षिणेला नदिपलीकडे महानुभव पंथाचा एक मोठा आश्रम आहे.तेथुन संपुर्ण खोडदचं विहंगमय दर्शन होतं.
उत्तरेला नारायणगड.त्याच्या कुशीत वसलेली आहे ती गडाची वाडी.(•दशरथ पानमंद)


{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}

१२:२४, ९ जुलै २०११ ची आवृत्ती

  ?जुन्नर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
शिवनेरी किल्ला, जुन्नर
शिवनेरी किल्ला, जुन्नर
शिवनेरी किल्ला, जुन्नर
Map

१९° १२′ ००″ N, ७३° ५२′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे
लोकसंख्या त्रुटि: "२४७४०(इ.स.२००१)" अयोग्य अंक आहे (२००१)
कोड
आरटीओ कोड

• MH-14

जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला या गावापासून जवळच आहे.

विशेष माहिती

जुन्नरजवळ खोडद या गावी जगात दुसर्‍या क्रमांकाने शक्तिशाली समजली जाणारी एक महाकाय रेडिओ दुर्बीण आहे. ही दुर्बीण खगोलशास्त्राच्या निरीक्षणासाठी वापरली जाते.

डोळ्यांनी निरीक्षण करायच्या ऑप्टिकल दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणांना मर्यादा असल्याने हल्ली खगोलशास्त्राच्या अभ्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतो. या लहरींच्या अभ्यासावरुन त्या ग्रहाचे वा तार्‍याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. या लहरी पकडण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. अशा दुर्बिणीमुळे इतर तरंगलांबींपेक्षा आखुड असलेल्या रेडिओ तरंगलांबीच्या(१ मीटर) लहरींचे संकलन व अभ्यास करणे सोईस्कर झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मूलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरूप यांना रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहन केले. डॉ. गोविंद स्वरुपांनी या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व तिला मान्यता मिळविली.

खोडदच्या परिसरात रेडिओ लहरींना प्रभावित करू शकतील अशा इतर चुंबकीय लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. त्यामुळे रेडिओ दुर्बिंणीसाठी खोडदची निवड केली गेली. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १९८२-८३च्या सुमारास सुरू झाले व १९९४ च्या सुमारास पूर्ण झाले. या प्रकल्पात अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यासाच्या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्या. एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर वाय आकाराच्या १६ अँटेना आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरात उभारल्या आहेत. ज्या आकाशस्थ वस्तूपासून येणार्‍या लहरींच्या स्त्रोताचे निरीक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे सर्व अँटेनांच्या तबकड्या वळविल्या जातात. या तबकड्या अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तित करून जोडलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. व तिथून त्या पुढील संशोधनासाठी, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेतील संगणकाकडे पाठवल्या जातात. याचा अर्थ असा की या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरीत्या वापरल्या जातात.

या प्रकल्पात अँटेनाच्या डिशसाठी मेश (जाळी) तंत्रज्ञान प्रथमच वापरले गेले. यापूर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तित व्हाव्यात म्हणून सलग धातूचा पत्रा वापरला जाई. डॉ. स्वरूपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जाऊ शकत नाहीत व पर्यायाने त्या परावर्तित होतात. या तंत्रज्ञानाने डिशचे वजन कमी झाले, ती फिरवण्यासाठी कमी शक्ती लागून वार्‍याचा अवरोध कमी झाला, आणि एकंदरीतच उभारणीचा खर्चही कमी झाला. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे. या रेडिओ दुर्बिणीमुळे भारताला खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्त्वाची प्रगती करता आली.. डॉ. स्वरूप(वय ८०) यांच्याबरोबर आज(सन २०११) डॉ.कपाही, प्रो. अनंतकृष्णन असे इतर काही शास्त्रज्ञही काम करतात.

कसे पोहचाल

कल्याणवरुन राज्य महामार्ग २२२ वरून बसने ओतुर येथे उतरून तेथूनच ओतुर-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे उतरून तेथूनच नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.

इतिहास

जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.

सामाजिक माहिती

बेल्हे

जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावाला राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावामध्ये बेल्हेश्वर नावाचे मंदिर आहे. बेल्हे गावचा "बैलांचा बाजार" सबंध पुणे जिल्ह्यत प्रसिद्ध आहे. गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. नावाजलेले तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याची समाधी बेल्हे गावाजवळील "आळे" या ठिकाणी आहे.

खोडद

खोडद,पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील ४५०० ते ५००० लोकवस्तीचं गाव.पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावाच्या पुर्वेला वसलेला सुंदर गाव.गाव तसं जेमतेम पन सुरेख. गावठाणाभोवती मिना नदी गावच्या सौंदर्यात भर घालते.गावचं ग्रामदैवत आई मुक्ताई.गावकर्यांचं नितांत श्रधास्थान.मंदिरासमोरील दर्गा गावातील हिंदु-मुस्लिम ऍक्याची साक्ष देतो.त्याचबरोबर गावच्या उत्तरेला एक आनी दक्षिणेला एक अशी २ हनुमान मंदिरे,नदितीरावर एक महादेवाचं आणि एक विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर आहे.विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं वैशिष्ट्य म्हनजे पंढरपुरच्या विठोबास जसा चंद्रभागेचा वळसा आहे तसाच ईथेही मिना नदीचा.सध्या गावठाणामधे एक भव्य राम मंदिर उभं रहात आहे.एकंदरीतच गावकरी भाविक आनी श्रधाळु आहेत. गावाच्या पुर्वेला एक डोंगर आहे पिरॅमिडच्या आकाराचा-सुळक्या. पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही.५ कि.मी. अंतरावर एक गाव आहे-मांजरवाडी.खोडद-मांजरवाडी नेहमी हातात हात घालुन चालनारी गावं.जुने रुनानुबंध आहेत. दक्षिणेला नदिपलीकडे महानुभव पंथाचा एक मोठा आश्रम आहे.तेथुन संपुर्ण खोडदचं विहंगमय दर्शन होतं. उत्तरेला नारायणगड.त्याच्या कुशीत वसलेली आहे ती गडाची वाडी.(•दशरथ पानमंद)