"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: en:Surya Siddhanta
ओळ ३१: ओळ ३१:
[[वर्ग: प्राचीन साहित्य]]
[[वर्ग: प्राचीन साहित्य]]


[[en:Surya Siddhanta]]
[[fr:Surya Siddhanta]]
[[fr:Surya Siddhanta]]
[[hi:सूर्य सिद्धांत]]
[[hi:सूर्य सिद्धांत]]

१०:४६, १३ एप्रिल २०११ ची आवृत्ती

सूर्य सिध्दान्त हा प्राचीन खगोलशास्त्रावरील ग्रंथ आहे. सूर्य सिध्दान्त हा ग्रंथ स्वतः सूर्याने दिला असे एक पौराणिक मत आढळते. तर आधुनिक मतानुसार सूर्यसिध्दान्त याचा लेखक माहिती नाही. किंवा लेखक कोण याविषयी मतभिन्नता आढळते असे म्हणता येईल. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. म्हणून या ग्रंथावर, 'ग्रीक किंवा मेसापोटामिया येथील तत्त्वज्ञांची भारतीय प्रत' असा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. इस.पूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिध्दान्त, पौलिश सिध्दान्त आणि रोमक सिध्दान्त या ग्रंथात याचा उल्लेख आहे. तसेच वराह मिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळतात.

स्वरूप

एका वर्षात पृथ्वीच्या भ्रमणाला लागणारा काळ, याची अचूक माहिती या ग्रंथात नोंदवलेली आहे, ती ३६५.२५६३६२७ दिवस अशी आहे. ही माहिती आजच्या मान्यतेनुसार जवळपास अचूक आहे.

या ग्रंथात ग्रहगोल आणि त्यांचे आकार यावर माहिती आहे.

ग्रहांचे आकारमान -

  • शुक्र - सूर्यसिध्दान्तानुसार शुक्राचा आकार ३००८ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचा आकार ३०३२ मैल आहे.
  • शनी - त्याचप्रमाणे सूर्यसिध्दान्तानुसार शनीचा आकार ७३८८२ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की ७४५८० मैल आहे. म्हणजे फक्त सुमारे १ टक्क्याचा फरक यात दिसला आहे.

तसेच सूर्यसिध्दान्तातच गणित शाखेतील साईन व कॉस यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा उहापोहही या ग्रंथात आहे. एकुणच सुर्यसिद्धांत हा ग्रंथ रोचक आहे. या ग्रंथाचा आवाका वैश्विक मिती या संदर्भात आहे. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस या अभ्यासकाने Surya-Siddhanta; a text-book of Hindu astronomy या नावाने इ.स. १८५८ मध्ये केले.

बाह्य दुवे

अधिक माहिती