"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो [r2.5.1] सांगकाम्याने बदलले: en:Dhule district
छोNo edit summary
ओळ ४०: ओळ ४०:


{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[Category:धुळे जिल्हा]]
[[वर्ग:धुळे जिल्हा]]
[[Category:खानदेश]]
[[वर्ग:खानदेश]]


[[en:Dhule district]]
[[en:Dhule district]]

२३:३२, ९ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

हा लेख धुळे जिल्ह्याविषयी आहे. धुळे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
  ?धुळे जिल्हा

महाराष्ट्र • भारत
—  जिल्हा  —
Map

२०° ५४′ १२″ N, ७४° ४६′ २९″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८,०६३ चौ. किमी
हवामान
वर्षाव

• ५४४ मिमी (२१.४ इंच)
मुख्यालय धुळे
तालुका/के धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
१७,०७,९४७ (इ.स. २००१)
• २११.८६/किमी
९४४ /
७१.६० %
संकेतस्थळ: http://dhule.nic.in

धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, नकाणे तलाव], राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.

धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्रीशिंदखेडा.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी.इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हामध्यप्रदेश राज्य

जिल्ह्याची लोकसंख्या १७,०८,९९३ इतकी असून त्यात पुरुष: ८,७८,५३८ महिला: ८,३०,४५५ असे प्रमाण आहे जिल्ह्याची साक्षरता ७२.०८% आहे. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिध्द आहेत जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२ मिमी. इतका पडतो.

शेती

पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके- ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, गहू, ऊस

जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत. दळणवळणाची साधने-रेल्वे स्थानकांची संख्या: १२ (मध्य रेल्वे.-५, पश्चिम रेल्वे-७),रस्ते: राष्ट्रीय महामार्ग:


पर्यटनाची स्थळे-लळिंग किल्ला, लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी मंदिर, धरणे, बिजासन देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ

संदर्भ