"अभंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 183.87.59.113 (चर्चा)यांची आवृत्ती 570847 परतवली.
ओळ १: ओळ १:
अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे.
'''अभंग''' हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे.
काव्यप्रकार म्हणून अभंगाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव संत ज्ञानेश्वर इ संतमेळा्याचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसर्‍या व तिसर्‍या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

ओळ १०: ओळ १०:
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://www.namdeoshimpisamaj.org/Saint_Namdeo_Maharaj/gatha/ नामदेवाचे अभंग]
* [http://www.namdeoshimpisamaj.org/Saint_Namdeo_Maharaj/gatha/ नामदेवाचे अभंग]

[[Category:मराठी साहित्य]]
[[वर्ग:मराठी साहित्य]]
बोला तुकाराम् महाराज् कि जय् !...........

०९:०८, २५ जुलै २०१० ची आवृत्ती

अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून अभंगाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव संत ज्ञानेश्वर इ संतमेळा्याचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसर्‍या व तिसर्‍या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

उदा. सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।

तर लहान अभंगात दोन चरणखंड प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले।। अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३ व्या शतकातील नामदेव ज्ञानेश्वरांपासून १७ व्या शतकातील निळोबांपर्यंत अनेक संतांनी प्रचंड अभंगरचना केली आहे. असे असले तरी संत तुकाराम यांनीच या काव्यप्रकाराला सर्वाधिक उंचीवर नेले. कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे महात्म्य सांगीतले जाते. आधुनिक काळातही केशवसुतांपासून मर्ढेकर-करंदीकर व त्यापुढच्या पिढीतील दिलीप चित्रे व अरुण कोलटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. अभंगाचे वृत्त वापरून सामाजिक सुधारणेची व सत्यधर्माची शिकवण देणार्‍या महात्तमा जोतिबा फुले यांनी अखंड लिहिले. तेही अभंगाचेच वेगळे रूप होय.

बाह्य दुवे