"विल्यम वर्ड्‌स्वर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:വില്യം വേഡ്‌സ്‌വർത്ത്‌
छो सांगकाम्याने वाढविले: ta:வில்லியம் வேர்ட்ஸ்வொர்த்
ओळ ५६: ओळ ५६:
[[sv:William Wordsworth]]
[[sv:William Wordsworth]]
[[sw:William Wordsworth]]
[[sw:William Wordsworth]]
[[ta:வில்லியம் வேர்ட்ஸ்வொர்த்]]
[[te:విలియం వర్డ్స్ వర్త్]]
[[te:విలియం వర్డ్స్ వర్త్]]
[[tr:William Wordsworth]]
[[tr:William Wordsworth]]

१२:४८, १२ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

विल्यम वर्ड्सवर्थ हे इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत. विल्यम शेक्सपियर यांच्या नंतर इंग्रजी साहित्यात याच विल्यमचे नाव आदराने घेतले जाते.

विल्यम वर्ड्सवर्थ यांचा जन्म ७-एप्रील-१७७० ला झाला. जॉन वर्ड्सवर्थ आणि अॅन कुकसन यांच्या पाच अपत्यातील विल्यम हे दुसरे. मोठे झाल्यावर विल्यम वर्ड्सवर्थ यांचा मोठा भाऊ रिचर्ड हे वकील झाले, लहान बहीण डॉरथी या विल्यम सारख्याच कवयित्री झाल्या, त्यानंतरचा भाऊ जॉन हेही कवी होते तर सगळ्यात लहान भाऊ क्रिस्टोफर हे मोठे झाल्यावर एक विद्वान म्हणून नावाजले.

विल्यमचे वडील जॉन हे जेम्स लोथर नावाच्या एका जमिनदाराकडे (Earl) नोकरीस होते. त्यांना मुलांसाठी वेळ कमी मिळत असे. पण जेव्हा मोकळा वेळ मिळे तेव्हा ते शेक्सपियर, मिल्टन, स्पेन्सर सारख्या कवींच्या कविता मुलांना शिकवत असत. त्यामुळे मुलांना साहित्यात गोडी निर्माण झाली. १७७८ साली विल्यमच्या आईचे निधन झाले. त्यानंतर विल्यमला हॉकशेड ग्रामर स्कुल या शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या शाळेतील मेरी हचिंसनशी त्यांची मैत्री झाली, मोठे झाल्यावर विल्यमने त्यांच्याशी लग्न केले.

१७८७ साली सेंट जॉन कॉलेज, केंब्रिज मध्ये शिकत असतांना विल्यमने पहिले सुनित (Sonnet) लिहिले. निसर्ग कवी, तलावाच्या जिल्ह्यातील कवी म्हणून ओळखले जाणारे विल्यम यांनी १७९०-९१ साली फ्रान्स , स्वित्झर्लंड , इटली येथील अनेक निसर्गरम्य ठिकाणानांना भेटी दिल्या. फ्रान्स मध्ये त्यांची ओळख अनेट वॅलनशी झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह केला. त्यांना कॅरोलीन नावाची मुलगी झाली. फ्रान्स आणि इंग्लंड मधल्या तणावामुळे बायको आणि मुलीला तेथेच सोडून विल्यम एकटेच इंग्लंडला परतले. विल्यमला नेहमीच आपल्या बायको आणि विशेषतः लहान मुलगी कॅरोलीनची आठवण येत असे. त्यांनी कॅरोलीनवर कवित्या लिहिल्या. १७९३ मध्ये विल्यम वर्ड्सवर्थ यांचे An Evening Walk आणि Descriptive Sketches नावाचे कविता संग्रह प्रकाशित झाले. हे दोन्ही कविता संग्रह गाजले, कविता लिहिण्यासाठी विल्यम वर्ड्सवर्थ यांना ९०० पाऊण्डची शिष्यवृत्ती देण्यात आली.

१७९५ साली विल्यम वर्ड्सवर्थ यांची कॉलरिज यांच्याशी ओळख झाली, पुढे दोघांची मैत्री जमली. १७९८ साली प्रकाशित कॉलरिज आणि वर्ड्सवर्थ यांनी मिळून Lyrical Ballads नावाचा कविता संग्रह लिहिला. हा कविता संग्रह Romantic Movement मधला सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो.