"वर्ग:भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २०: ओळ २०:
==भूगोलाच्या शाखा==
==भूगोलाच्या शाखा==
===भौतिक भूगोल===
===भौतिक भूगोल===
भौतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने भू-शास्त्राचे अध्ययन करते. पृथ्वीच्या भौतिक वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. भौतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.
{| class="wikitable"
|- style="background-color: #adf;"
!भौतिकभूगोलाची शाखा!!करण्यात येणारे अध्ययन
|-
|[[भूस्तरशास्त्र Geomorphology]] || [[खडकांची व मातिची निर्मीती]]
|-
|[[जलावरणशास्त्र Hydrology]] || [[जलचक्र]], [[पाण्याचे विविध स्त्रोत]]
|-
|[[हिमनगशास्त्र Glaciology]] || [[हिमनग]]
|-
|[[जैवभूशास्त्र Glaciology ]] || [[प्रजाती]]
|-
|[[हवामानशास्त्र Climatology]] || [[हवामान]]
|-
|[[मृत्तीकाशास्त्र Pedology ]] || [[माती]]
|-
|[[सामुद्रतटशास्त्र Marine studies]] || [[समुद्रतट]]
|-
|[[समुद्रशास्त्र Oceanography]] || [[सागर आणि उपसागर]]
|-
|[[भूमंडलशास्त्र Geodesy]] || [[गुरूत्वाकर्षण]], [[चुंबकीयक्षेत्रे]]
|-
|[[द्विपशास्त्र Palaeogeography]] || [[महाद्विपीय संचय]]
|-
|[[पर्यावरणीय भूगोल Environmental geography]] || [[पर्यावरणशास्त्र]]
|-
|[[परिस्थितीविज्ञान भूगोल]] || [[नत्रवायूचक्र Nitrogen Cycle]]
|-
|}
====भूस्तरशास्त्र(Geomorphology)====
====भूस्तरशास्त्र(Geomorphology)====
====सामुद्रीतट शास्त्र (Costal/Marine Studies)====
====सामुद्रीतट शास्त्र (Costal/Marine Studies)====

२२:२१, २३ ऑक्टोबर २००६ ची आवृत्ती

प्रस्तावना

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography असे नाव आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रिक शब्द --Ge किंवा Gaea या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहीणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांचीचा आणि त्याच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा अध्ययनाचा विषय होईल. भुगोलशास्त्रज्ञ चार पारंपारिक विचारातून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. त्या मध्ये
1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया
2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास
3. मनुष्य आणि पृथ्वी चा सहसंबध
4. भू-शास्त्र यांचा यामध्ये समावेश होतो.

पारंपारिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेऊन विचार केल्या जातो जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्त्रामध्ये आणि नकाशातंत्राच्या अध्ययनात पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययानात पृथ्वी व अंतराळाच्या व मानवाच्या संबधाचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश अध्ययनात असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकिय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या संर्वांवर एकमेकांचा प्रभाव पडत असतो.

एखाद्या ठिकाणाचे फक्त अध्ययन करणे म्हणजे भूगोल नव्हे.

भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक भूगोल अश्या दोन मुख्य उपशाखांद्वारे अभ्यास केल्या जातो. या उल्लेखिलेल्या दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण निर्माण कसे झाले. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेचा; मानवी दृष्टीकोनातुन मानवाचा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्व यांचा अभ्यास करणे हा उद्देश्य आहे. व भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, वनस्पती, जीवन, माती, जल आणि भूरचना हे सर्व कश्या प्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केल्या जातो. या दोन्ही शाखांचा अभ्यास करतांना एका भूगोलाच्या अध्ययनाच्या तिस-या शाखेची निर्मीती झाली ती म्हणजे पर्यावरणीय भूगोल. या शाखेत या दोन्ही शाखांचा एकमेकांवर पडणा-या प्रभावातुन निसर्ग व मानवाचा संबध लक्षात येतो.

भूगोलाचा इतिहास

मुख्य लेख भूगोलाचा इतिहास वाचा. भूगोलाचे अध्ययन प्राचिन ग्रिक संस्कृतीमध्ये केलेले आढळते. ग्रिकांनी शास्त्र व तत्वज्ञान म्हणून भूगोलाचे अध्ययन केले आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचिन ग्रिक शास्त्रज्ञ अरिस्टोटल ने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व इरॅथोसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशे सुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अशांमध्ये विभागुन अक्षांक्ष व रेखांशाची कल्पना मांडली.

मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा युरोपकडुन मुस्लीम जगाकडे आली. इदरसी (Idrisi), इब्न बटुटा, (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरीत करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रिकांचे सर्व साहित्य संपदा अनेक शास्त्रज्ञांनी भाषांतरीत केली व बगदाद येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली.

सोळाव्या व सतराव्या शतकामध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्क पोलो व जेम्स कुक यांनी पुष्कळ नवीन खंडाचा शोध लावला व काही नकाशे त्यांच्या अनुभवांवर नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होवून युरोप मधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होवू लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयाचा समावेश होता. अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अध्ययना करिता पुष्कळ भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफीकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफीकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफीक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेतशी संबध जोडण्याकरीता इम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डी ला ब्लैंचे यांनी योगदान दिले.

गत दोन शतकांमध्ये संगणकाच्या आविष्कारामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर परिष्कृत पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये २० व्या शतकापासुन पर्यावरणीय सिद्धांत, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती (आंकड्याच्या सहाय्याने परिणाम निश्चिती), समालोचनात्मक भूगोल अश्या विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्याअध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.

भूगोलाच्या शाखा

भौतिक भूगोल

भूस्तरशास्त्र(Geomorphology)

सामुद्रीतट शास्त्र (Costal/Marine Studies)

जलावरणशास्त्र (Hydrology / Hydrography)

  • ग्लायकॉलॉजी (Glaciology)
  • लिम्नोलॉजी (Limnology)
  • ओशोनोग्राफी (Oceanography)

हवामानशास्त्र (Climateograpy)

मृत्तीकाशास्त्र (Pedology)

  • बायोजियोग्राफी ((Biogeography)
  • पॅलेजिओग्राफी(Palaeogeography) आणि पॅलेक्लाईमेटोग्राफी (Palaeoclimetology)
  • पर्यावरणीय भूगोल आणि प्रबंध (Environmental Geography)
  • परिदृश्य (Landscape ecology)

मानवी भूगोल

मानवी भूगोल ही भूगोलाच्या अध्ययनाची एक शाखा असून यामध्ये मानव आणि पर्यावरण यांच्या परस्परसंबधाचा अभ्यास केल्या जातो. हे अध्ययन मानवी, राजकीय, सांस्कृतीक, सामाजिक आणि आर्थिक बाबींभोवती फिरते. मानवी भूगोलात भू-रचनाशास्त्राला दुय्यम महत्व आहे. परंतु भू-रचनेवरच मानवाचे जीवन अवलंबुन असल्याकारणामुळे त्याचे सुद्धा अध्ययन केल्या जाते. मानवी भूगोलाचा ढोबळमानाने पुढील उपविभागांमध्ये अध्ययन केल्या जाते.

आर्थिक भूगोल

यातायात भूगोल

विकास भूगोल

जनसंख्याशास्त्र

नागरी भूगोल

सामाजिक भूगोल

आचारणिय भूगोल

ऐतिहासिक भूगोल

प्रागैतेहासिक भूगोल

पर्यटन भूगोल

युद्धनैतिक भूगोल

सैन्य भूगोल

स्त्री भूगोल

पर्यावरणीय भूगोल

बाल भूगोल

पारिस्थितकीय भूगोल

संबधित क्षेत्र

भौगोलिक तंत्रज्ञान

निवडक भू-वैज्ञानिकांची माहिती

संदर्भ सूची

थोडक्यात महत्वाचे

बाह्यदुवे

ही माहिती http://en.wikipedia.org/wiki/Geography वरून संपादित केल्या जात आहे. (अपूर्ण) संजय देवताळू,नांदुरा deotalu_sp@yahoo.com 13:30, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

उपवर्ग

एकूण ३४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३४ उपवर्ग आहेत.

 

"भूगोल" वर्गातील लेख

एकूण ९८ पैकी खालील ९८ पाने या वर्गात आहेत.

"भूगोल" वर्गातील माध्यमे

या वर्गात फक्त खालील संचिका आहे.