"विष्णु नारायण भातखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:Bhatkhande.jpg|thumb|right|250px|विष्णू नारायण भातखंडे]]
हिंदुस्थानी संगीताचे संशोधक, संगीतकार
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट १०]], [[इ.स. १८६०|१८६०]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १९३६|१९३६]]) हे [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीताचे]] संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची [[थाट|थाट पद्धत]] विकसवली.


==जीवन==
----
भातखंड्यांचा जन्म [[ऑगस्ट १०]], [[इ.स. १८६०|१८६०]] रोजी [[जन्माष्टमी]]च्या दिवशी [[मुंबई|मुंबईत]] वाळकेश्वरात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईचे [[एलफिन्स्टन कॉलेज]] व [[पुणे|पुण्याच्या]] [[डेक्कन कॉलेज|डेक्कन कॉलेजात]] झाले. इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ [[कराची|कराचीच्या]] [[उच्च न्यायालय|उच्च न्यायालयात]] त्यांनी वकिली केली. <br />
[[Category:मराठी व्यक्ति]]
भातखंड्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून [[सतार]] शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या [[ध्रुपद|ध्रुपदगायकाकडून]] ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले.<br />
पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंड्यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी [[भरत|भरताच्या]] [[नाट्यशास्त्र|नाट्यशास्त्राचा]] आणि [[संगीत रत्नाकर]] या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथाचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीताकरता विकसवली.<br />
उतारवयात भातखंडे [[पक्षाघात]] व मांडीच्य अस्थिभंगामुळे अंथरूणास खिळून होते. [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १९३६|१९३६]] रोजी [[गणेश चतुर्थी|गणेश चतुर्थीच्या]] दिवशी त्यांचे निधन झाले.


{{DEFAULTSORT:भातखंडे,विष्णू नारायण}}
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:हिंदुस्तानी संगीतकार]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]

[[en:Vishnu Narayan Bhatkhande]]

२३:०७, १९ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

विष्णू नारायण भातखंडे

विष्णु नारायण भातखंडे (ऑगस्ट १०, १८६० - सप्टेंबर १९, १९३६) हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसवली.

जीवन

भातखंड्यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६० रोजी जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईत वाळकेश्वरात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेजपुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.
भातखंड्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले.
पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंड्यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथाचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीताकरता विकसवली.
उतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्य अस्थिभंगामुळे अंथरूणास खिळून होते. सप्टेंबर १९, १९३६ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले.