"राज्यपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ ८: ओळ ८:


==== भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता ====
==== भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता ====
राज्यपालाच्या नेमणुकिसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
# ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
# ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
# त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.<ref name=":0" />
# त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.<ref name=":0" />

१६:४४, १९ जून २०२२ ची आवृत्ती

राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.

जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.

भारतातील नियुक्ती

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. [१]

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -

  1. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
  2. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.[१]

३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्यातरी सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.

भारतातील कार्यकाल

सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.[१]

मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते

राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.

हे सुद्धा पहा

  1. ^ a b c http://spardhapariksha.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-2/