"अजंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १३०: ओळ १३०:


[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:मालेगाव तालुका]]

२०:०२, ३ जुलै २०२१ ची आवृत्ती

  ?अजंग

महाराष्ट्र् • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५४० मी
जवळचे शहर मालेगाव
विभाग खान्देश
तालुका/के मालेगाव
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
६,८२४ (२०११)
१.०७ /
७७.४० %
• ८४.६१ %
• ७९.७६ %
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ धुळे
विधानसभा मतदारसंघ मालेगाव बाह्य
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४२३२०६
• +०२४३८


स्थान

अजंग हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यात मालेगाव या शहरापासून १० किलोमीटर अंतरावर रस्त्यावर वसलेले मोठ्या आकाराचे गावआहे.

लोकजीवन

२०११ च्या जनगणनेनुसार गावात १३७५ घरे आहेत तर गावाची एकूण लोकसंख्या ६८२४ इतकी आहे. त्यापैकी ३५३७ पुरुष तर ३२८७ महिला. ० ते सहा वयोगटातील एकूण बालकांची संख्या ९५२ ( ५१६ मुले , ४३६ मुली) ईतकी आहे.  

प्रशासन

इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. गावाचा कारभार भारतीय राज्यघटना व पंचायती राज कायद्याप्रमाणे सरपंच पाहतात.अजंग हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा तर धुळे लोकसभा क्षेत्रात येते.

शिक्षण

या गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे. तसेच लहान मुलांसाठी आंगणवाडी आहे. महाविद्यालयीन शिक्षण मालेगाव किंवा नाशिक यांपैकी कुठल्याही एका ठिकाणाहून पूर्ण केले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार गावातील साक्षरता दर ७७.४० % हा (पुरुष ८४.६१% ; महिला ६९.७६%) इतका आहे.

आरोग्य

गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामार्फत सरकारी आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावात खाजगी इस्पितळे हि आहेत.

व्यवसाय

शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हि केला जातो.