"प्राकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५० बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारित रूप आहे.
 
ज्या समूहाने मूळ भाषेचे संस्कारित रूप स्वीकारून त्याच्यात व्यवहार केला, त्या शिष्टांच्या भाषेचे, म्हणजेच संस्कृतचे व्याकरण महर्षी पाणिनीने सिद्ध केले. पाणिनीच्या अष्टाध्यायीवर कात्यायन वररुचीने वार्तिक लिहिले आणि याच वार्तिककाराने महाराष्ट्री, पैशाची इत्यादी प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध करणारा 'प्राकृत प्रकाश' हा ग्रंथ लिहिला. कात्यायनासाठी या दोन भाषाप्रकारांमधील श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण? कोणापासून कोण निघाला? हे प्रश्न नाहीत. प्राकृत भाषांपैकी महाराष्ट्रीचे व्याकरण सांगून इतर प्राकृत भाषांचे व्याकरण सांगताना, त्यांची त्यांची वैशिष्ट्ये विशद करून 'शेषं महाराष्ट्रिवत्' असा शेरा मारून तो विषय संपवून टाकतो. तसाच प्रकार त्याला संस्कृतचे व्याकरण सांगून झाल्यावर प्राकृत भाषांची वैशिष्ट्ये सांगून 'शेषं संस्कृतवत्' असे म्हणून करता आला असता; पण तो तसे करीत नाही, याचे कारण त्याला भाषांचा इतिहास ज्ञात असावा, हेच असावे. संस्कृत या भाषारूपामुळे होणारी जनसामान्यांची कोंडी फोडण्यासाठी बौद्धजैनादि धर्माचार्यांनी प्राकृतचा आश्रय करुणाबुद्धीने केला, हे त्यांचे उपकारच होत, यात शंका नाही. असे करताना त्यांनी गरजेप्रमाणे संस्कृतच्या अभिमान्यांना आव्हाने दिली, हेही योग्यच होते. याचे प्रमाण बौद्धांपेक्षा जैन धर्मियांमध्येधर्मीयांमध्ये अधिक दिसून येते; पण तो वेगळा मुद्दा.
 
महाराष्ट्रात ही परंपरा संतांनी चालवली. संस्कृत काव्यात व म्हणून संस्कृत काव्यशास्त्रात अभावाने आढळणाऱ्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी मराठीत करून दाखवल्या. एकनाथांनी तर 'संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासून आली?' असा भेदक प्रश्न उपस्थित करून, पंडितांना मोठाच धक्का दिला.
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी