"सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४५: ओळ ४५:
| आई =
| आई =
| नातेवाईक =
| नातेवाईक =
| पुरस्कार = २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार{{संदर्भ हवा}}<br/> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]] (२०१२)<ref name="auto"/> [[पद्मविभूषण पुरस्कार]]
| पुरस्कार = २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार{{संदर्भ हवा}}<br/> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]] (२०१२)<ref name="auto"/> [[पद्मविभूषण पुरस्कार]] (२०२०)
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =

१५:२७, ३० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

सिंधुताई सपकाळ
चित्र:Sindhutai Sapkal.jpg
जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे चिंधी
नागरिकत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
पुरस्कार २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार[ संदर्भ हवा ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१] पद्मविभूषण पुरस्कार (२०२०)


सिंधुताई सपकाळ (जन्म: १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा, महाराष्ट्र - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.[२]

जन्म व बालपण

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरचे गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.[ संदर्भ हवा ]

विवाह

सिंधुताईं सपकाळ यांचा विवाह

विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.[ संदर्भ हवा ]

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.[ संदर्भ हवा ]

जीवनातील संघर्ष

दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.[ संदर्भ हवा ]

ममता बाल सदन

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. [३]

सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-

  • बाल निकेतन हडपसर ,पुणे
  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा
  • अभिमान बाल भवन , वर्धा *
  • गोपिका गाईरक्षण केंद्र , वर्धा ( गोपालन) [३]
  • ममता बाल सदन, सासवड
  • सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे[४]

आंतरराष्ट्रीय पातळीवर

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.[५]

पुरस्कार व गौरव

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.[३] त्यांतले काही :-

  • पद्मश्री पुरस्कार (२०२१)[६][७]
  • महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१]
  • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
  • महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
  • मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
  • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
  • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • राजाई पुरस्कार
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
  • श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
  • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
  • २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)[८]
  • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)[९]
  • पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' [४]
  • पद्मविभूषण पुरस्कार (२०२०)[१०]

प्रसारमाध्यमांतील चित्रण

  • सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.[११]
  • सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.

संदर्भ

  1. ^ a b "सिंधुताई सपकाळसह ७१ जणांना समाजभूषण पुरस्कार प्रदान". Divya Marathi.
  2. ^ Chavan, Vishwas (2012-06-15). Vishwasutras: Universal Principles for Living: Inspired by Real-Life Experiences (इंग्रजी भाषेत). AuthorHouse. ISBN 9781468581638.
  3. ^ a b c "Mamata Bal Sadan Saswad, Pune | Sindhutail Sapkal". www.sindhutaisapakal.org (इंग्रजी भाषेत). 2018-07-11 रोजी पाहिले.
  4. ^ a b शेजवलकर, प्र. चिं. (२०१३). यशोगाथा. पुणे: यशवंत पब्लिशिंग हाऊस. pp. ४९-५०. ISBN 978-81-926412-2-5.
  5. ^ "सिंधूताईंची संस्था आता सातासमुद्रापार! ( २८. १२. २०१७)".
  6. ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26 रोजी पाहिले.
  7. ^ "मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर". Loksatta. 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
  8. ^ "माजी न्या. नरेंद्र चप‌ळगावकरयांना भोसले स्मृती सन्मान (७.७. २०१८)". line feed character in |title= at position 54 (सहाय्य)
  9. ^ "सिंधुताईंना डॉ. राममनोहर त्रिपाठी सन्मान पुरस्कार ( ९. ११. २०१७)".
  10. ^ "padma awards : पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश". Maharashtra Times. 2021-01-30 रोजी पाहिले.
  11. ^ "गोरा रंग, घाऱ्या डोळ्यांमुळे तेजस्विनी 'सिंधूताई'साठी झाली होती रिजेक्ट, नंतर असा मिळाला रोल (१४. ११. २०१७)". line feed character in |title= at position 93 (सहाय्य)