"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६८: ओळ ६८:
* अक्षरांशी गप्पा
* अक्षरांशी गप्पा
* आपले‘से’
* आपले‘से’
* [[आप्‍त, पुस्तक|आप्त]] (१९९७)
* आप्‍त (१९९७)
* कार्यमग्न
* कार्यमग्न
* [[कार्यरत, पुस्तक|कार्यरत]] (१९९७)
* [[कार्यरत, पुस्तक|कार्यरत]] (१९९७)
*[[कुतूहलापोटी, पुस्तक|कुतूहलापोटी]] (२०१७)
*[[कुतूहलापोटी, पुस्तक|कुतूहलापोटी]] (२०१७)
* [[कोंडमारा, पुस्तक |कोंडमारा]] (१९८५)
* कोंडमारा (१९८५)
* [[गर्द, पुस्तक|गर्द]] (१९८६)
* गर्द (१९८६)
* [[छंदांविषयी, पुस्तक|छंदांविषयी]] (२०००)
* [[छंदांविषयी, पुस्तक|छंदांविषयी]] (२०००)
* [[छेद, पुस्तक|छेद]]
* [[छेद, पुस्तक|छेद]]

१३:०३, २६ जुलै २०२० ची आवृत्ती


अनिल अवचट
जन्म १९४४
ओतूर, पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पत्रकार, लेखक, समाजसेवक
कार्यकाळ १९६९ - चालू
पत्नी डॉ. सुनंदा अवचट
अपत्ये मुली - मुक्ता आणि यशोदा
पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार

रिपोर्ताज पद्धतीचे लेखन

जन्म आणि  शिक्षण

अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून येते.

  • साहित्यक्षेत्रात -

१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांमध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. स्वतःचे छंद, अनुभव, कथा असे विविधांगी लेखन ते करतात.[१]

  • मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र -

डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविणाऱ्या काही व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरे.

  • पत्रकारिता-

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च केलेल्या कार्यकर्त्यांवर लेखन केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत.

  • छंद-

डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.[१]

प्रकाशित पुस्तके

पुरस्कार

  • व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)[१]
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)
  • महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
  • “सृष्टीत.. गोष्टीत" या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
  • [१]डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत.
  • अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
  • सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).
  • साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.
  • डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार

पहा

मराठीतील साहित्यिक डॉक्टर

बाह्य दुवे


संदर्भ

  1. ^ a b c d "Anil Awachat (अनिल अवचट)". Anil Awachat (अनिल अवचट) (इंग्रजी भाषेत). 2018-07-14 रोजी पाहिले.