"वर्षावास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ११: ओळ ११:
* [[पंचशील]]
* [[पंचशील]]
* [[अष्टांगिक मार्ग]]
* [[अष्टांगिक मार्ग]]
* [[पारमिता|दहा पारमिता]]
* दहा पारिमितां


[[वर्ग:बौद्ध उपासना पद्धती]]
[[वर्ग:बौद्ध उपासना पद्धती]]

१५:५७, ४ जुलै २०२० ची आवृत्ती

भगवान बुद्ध धम्माचा सारनाथ येथे प्रथम उपदेश देताना
बुद्ध उपदेश

वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान - साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरीत नऊ महिने धम्म - प्रचार - प्रसाराला घालविणे हे भिक्खुंचे कार्य असते.

तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन माझ्या बहुजन हिताय - बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात.

वर्षावास
वर्षावास

भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिख्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बर्‍याच संकटांना आणि विशेषत: पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत त्यांनी हे तथागतांना सांगितले,बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षासाठी गावात जाऊ नये. ऐकाच ठिकाणी राहून धम्मचा पठण अध्ययन करावे जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इ.स.पू. ५२७ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला आणि त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अश्या प्राचीन गुरु शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्धराष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका कंबोडिया आणि बांगलादेश पालन करतात.

उपासकांनी पाळायची तत्वे.