"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
😊
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४२: ओळ ४२:
{{संकेतस्थळ स्रोत
{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.marathinayak.com/hashoks.html
|दुवा=http://www.marathinayak.com/hashoks.html
|शीर्षक=मराठीनायक.कॉम वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र
|title=मराठीनायक.कॉम वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र
|प्रकाशक=मराठीनायक.कॉम
|प्रकाशक=मराठीनायक.कॉम
|दिनांक=१२-०९-२००७
|दिनांक=१२-०९-२००७
ओळ ५९: ओळ ५९:
'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ ''सारखं छातीत दुखतंय!'' हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ ''सारखं छातीत दुखतंय!'' हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://esakal.com/esakal/09042007/MumbaiB1F84BE7C2.htm
|दुवा=http://esakal.com/esakal/09042007/MumbaiB1F84BE7C2.htm
|शीर्षक=अशोक सराफ पुन्हा रंगभूमीवर!
|title=अशोक सराफ पुन्हा रंगभूमीवर!
|प्रकाशक=सकाळ
|प्रकाशक=सकाळ
|दिनांक=१२-०९-२००७
|दिनांक=१२-०९-२००७

१५:११, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

अशोक सराफ
जन्म जून ४, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवुड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७१ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला
गंमत जंमत
अशी ही बनवाबनवी
आयत्या घरात घरोबा
वजीर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम
  • १. डोन्ट वरी होजायेगा.
  • २. हम पांच
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार
झी गौरव पुरस्कार
अपत्ये अनिकेत सराफ

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिनेअभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होत.[१]

त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अश्या साकारलेल्या आहेत. उत्कृष्ठ अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ इ. त्यांच्या अभिनयाची वैशिष्ठे होत.

अशोक सराफ, लक्ष्मिकान्त बेर्डे, सचिन, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत.

ओळख

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.[२]

हे उत्तम अभिनेते असून आपल्या अभिनयातून दर्शवले आहे.

अभिनय-प्रवास

अशोक सराफ निवेदिता जोशीसह

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.[३] पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट. अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले आहे.

कारकीर्द

अशोक सराफ जी यांनी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला.मुुुख्यात्वे . त्यानी सचिन , लक्ष्मीकांत बेर्डे
सारख्या प्रसिद्ध अभनेत्यान बरोबर कार्य केले.

अशोक सराफ यांनी मराठी नाटकां तून अभिनय शेत्रत पदार्पण केले. त्यांच्या वडिलां चा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. अशोक सराफ यांनी बॅंकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे. त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषका ची होती. दादा साहेब कोंडके यांच्या ' पांडू हवालदार' या चित्रपटात त्यांनी ' सखाराम हवालदार' या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनाल कॉमेडी स्वरूपाची आहे.

चित्रपट

  • मराठी चित्रपट-

अशोक सराफ यांनी अभिनय केलेले मराठी चित्रपटा -

चित्रपटाचे नाव भूमिका कार्य
आयत्या घरात घरोबा गोपु काका अभिनय
आमच्या सारखे आम्हीच अभय, भुपाल अभिनय
आत्मविश्वास विजय झेंडे अभिनय
नवरी मिळे नवऱ्याला बाळासाहेब अभिनय
गंमत जंमत फाल्गुन अभिनय
भुताचा भाऊ बंडू अभिनय
माझा पती करोडपती दिनेश लुकतुके अभिनय
अशी ही बनवाबनवी धनंजय माने अभिनय
एक डाव भुताचा खंडूजी फर्जंद अभिनय
एक डाव धोबीपछाड दादा दांडगे अभिनय
एक उनाड दिवस विश्वास दाभोळकर अभिनय
सगळीकडे बोंबाबोंब
साडे माडे तीन अभिनय
कुंकू
बळीराजाचं राज्य येऊ दे
घनचक्कर मानसु अभिनय
फुकट चंबू बाबुराव
तू सुखकर्ता विनायक विघ्नहर्ते अभिनय
नवरा माझा नवसाचा
वजीर
अनपेक्षित
एकापेक्षा एक
चंगू मंगू
अफलातून
सुशीला
वाजवा रे वाजवा
शुभमंगल सावधान प्रतापराव पाटील केतकावळीकर अभिनय
जमलं हो जमलं
लपंडाव
चौकट राजा
नवरा माझा ब्रम्हचारी
गोडीगुलाबी
गडबड घोटाळा
मुंबई ते मॉरिशस
धमाल बाबल्या गणप्याची
बाळाचे बाप ब्रम्हचारी
प्रेम करू या खुल्लम खुल्ला
गुपचुप गुपचुप
गोष्ट धमाल नाम्याची
हेच माझं माहेर
गोंधळात गोंधळ
चोरावर मोर
जवळ ये लाजू नको
पांडू हवालदार सखाराम हवालदार अभिनय
दोन्ही घरचा पाहुणा
राम राम गंगाराम
अरे संसार संसार
वाट पाहते पुनवेची
भस्म
खरा वारसदार
कळत नकळत
आपली माणसं
पैजेचा विडा
बहुरूपी
धूमधडाका अशोक अभिनय
माया ममता
सखी
बाबा लगीन
आयडियाची कल्पना
झुंज तुझी माझी
टोपी वर टोपी

हिंदी चित्रपट

अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व सहाय्यक भूमिका निभावल्या त्या चित्रपटांची नावे खाली दिलेली आहेत.

चित्रपट साकारलेली भूमिका वर्ष
कुछ तुम कहो कुछ हम कहें


बेटी नं. वन


कोयला


गुप्त


ऐसी भी क्या जल्दी है


संगदिल सनम


जोरू का गुलाम


खूबसूरत


येस बॉस


करण अर्जुन


सिंघम

२०११

प्यार किया तो डरना क्या


* रंगमंच

अशोक सराफ यांनी अभिनय केलेले नाटक-

नाटकाचं नाव
हमीदाबाईची कोठी
अनधिकृत
मनोमिलन
हे राम कार्डिओग्राम
डार्लिंग डार्लिंग
सारखं छातीत दुखतंय

दूरचित्रवाणी तील अभिनय कार्य

अशोक सराफ जी यांनी अभिनय केलेली टीव्ही वरील सिरीयल-

नाटकाचं नाव साकारलेली भूमिका टि.वि.चॅनल भाषा वर्ष
टना टना टन ई.टीव्ही मराठी मराठी
हम पांच आनंद माथुर झी टीव्ही हिंदी १९९५
डोन्ट वरी हो जाएगा सहारा टीव्ही संजय भंडारी हिंदी २००२
छोटी बडी बातें हिंदी

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ "मराठीनायक.कॉम वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र". Archived from the original on १० जानेवारी २०१४.
  3. ^ "अशोक सराफ पुन्हा रंगभूमीवर!". Archived from the original on १० जानेवारी २०१४.

बाह्य दुवे