५७,२९९
संपादने
No edit summary |
No edit summary |
||
}}
'''
|last= Farooqui |first= Amar |location= New Delhi| year=2001|publisher= Lexington Books |page=210|isbn=0739108867}}</ref>
==लोकहितकारी कामे==
माहीम बेट वांद्ऱ्याला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमसेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमसेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीबागेतील ‘डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियम’ची इमारत जमसेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमसेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे. जमसेटजींच्या मोठमोठ्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक आणि धर्मादाय संस्थांची संख्या १२६ हून अधिक आहे. त्यामध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर जे.जे. स्कूल ऑफ कमर्शियल आर्ट यांचाही समावेश होतो. जीजीभायनी सुरत, नवसारी, मुंबई आणि पुण्यात रुग्णालये, शाळा, अग्यारी स्थापन करून विहिरी तसेच तलाव खोदले. त्यांनी पांजरापोळ या संस्थेस गुरांच्या पैदाशीसाठी ८०,००० रुपयांची देणगी दिली. मुंबईतल्या ठाकुरद्वार येथे जमसेटजींनी गुरांच्या मोफत चरणीसाठी २०,००० रुपये देऊन समुद्रकाठाजवळ जमीन घेतली. पुढे याच ठिकाणी ‘चर्नी रोड’ हे रेल्वे स्थानक झाले.
==पारसी नाटकांसाठी नाट्यगृह==
मुंबईमध्ये पारसी नाटकांची सुरुवात जमसेटजी जीजीभाय यांनी केली. त्यासाठी त्यांनी सन १७७६ साली बांधलेले बाॅम्बे थिएटर आणि ग्रॅन्ट रोड थिएटर येथून सुरुवात केली. १८५३ साली बहुधा ऑक्टोबर महिन्यात पहिल्या पारसी नाटकाची निर्मिती झाली. सुरुवातीला नवशिक्यांनी सुरू केलेली ही नाट्य चळवळ थोड्याच काळात व्यावसायिक झाली.
==पुरस्कार आणि सन्मान==
जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.{{संदर्भ हवा}}
जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभाॅय यांचा भव्य पुतळा उभारला आहे.
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:मुंबई]]
|
संपादने