"वॉल्ट डिस्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (archiveदुवा संदर्भ त्रुटी सुधारली)
छो (Pywikibot 3.0-dev)
१९२८ साली मिकी माऊसचा पहिला ॲनिमेटेड बोलपट '''स्टीमबोट विली''' (Steamboat Willie) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने नवीन विक्रम प्रस्थापित करत इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवले. यानंतर डिस्नी आणि आयवर्क्स यांनी एकामागे एक सरस चित्रपटांची मालिका काढली त्यातील सर्वच चित्रपट अतिशय गाजले. आता कंपनीचा चांगलाच जम बसला, त्यांना पैसा आणि जागतिक प्रसिद्धी मिळू लागली. डिस्नी हे पूर्णपणे व्यावसायिक होते तसेच ते द्रष्टेही होते. त्यांनी फार पूर्वी केलेली एका विशाल करमणूक केंद्राची कल्पना त्यांच्या मनात होतीच. हा नवा विचार कृतीत आणण्यचे त्यांनी ठरविले. तसेच दूरचित्रवाणीचे आगमन होत असल्याने लोकप्रिय चित्रमालिका त्यावर सादर करण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागले.
 
हळुहळू [[डिस्नीलँडडिस्नीलॅंड]] रंगारूपास येऊ लागले. या भव्य दिव्य प्रकल्पासारखा दुसरा प्रकल्प जगात अन्यत्र कुठेही असू नये असे वॉल्ट डिस्नी यांना वाटत होते. यासाठी बँकबॅंक ऑफ अमेरिकेने कर्ज मंजूर केले.
 
१९६६ सालाच्या शेवटी वॉल्ट डिस्नी यांचे एक ऑपरेशन ठरले होते. त्यासाठी त्यांच्या चाचण्या घेतांना लक्षात आले की वॉल्ट डिस्नी यांच्या पोटात एक ट्यूमर झाला आहे. वॉल्ट यांचे पोटाचे ऑपरेशन आधी करावे असे ठरविण्यात आले. प्रत्यक्ष ऑपरेशनच्या आधी असे लक्षात आले की ट्यूमरची व्याप्ति खूप मोठी आहे. ऑपरेशन ऐवजी [[केमोथेरपी]]ने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी वॉल्ट डिस्नी यांचे आयुष्य सहा महिने ते वर्ष येवढेच असल्याचे त्यांना सांगितले. [[डिसेंबर १५]],[[इ.स. १९६६|१९६६]] रोजी वॉल्ट डिस्नी यांचा मृत्यू झाला.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी