Jump to content

"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो (Pywikibot 3.0-dev)
शूद्रांना त्याकाळी रिद्धपुरात पाणी पिण्याची सोय नव्हती.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त राऊळच सोडवू शकतात. म्हणून सर्व बांधव राऊळा जवळ गेले आणि विनंती केली "राउळो : आम्ही पाणियेंवीन मरते असों : तरि काइ की जी : ?" त्यावर लागलीच गोविंदप्रभुनी ज्या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकानी इशारा केला. विहीर खणल्यावर लगेच त्याला पाणी लागले. आपला प्रश्न इतक्या तातडीने सोडवल्याबद्दल सर्वच समाज बांधव खुश झाले. "राउळ माय राउळ बापु: राउळाचेनि प्रसादं आम्ही पाणी पीत असो." असे उद्गार या बांधवांनी काढले. या अगोदर दलितांच्या प्रश्नाला अशी वाचा कुणीच फोडली नव्हती. या अगोदर असा प्रयत्न महाराष्ट्रात कधीही झाला नाही. गोविंदप्रभुनी त्याकाळात केलेल्या या कार्याचा परिणाम इतका झाला की, हा समाज माणूस म्हणून जगू लागला.
स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता. इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत,तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप' म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. कधी सहज कुणाच्या मुखी शब्द यायचे " हे साचोकार ईश्वर होय: हे करणचरणवंत ब्रम्ह होय: जीवनमुक्त वस्तु ते ऐसी: " लगेच ते मिश्किलतेने उत्तर द्यायचे " ना हं मनुष्यो नच देवयक्षो न ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। न ब्रम्हचारी न गृहीवनस्थो: भिक्षुर्ण चाहं निज बोध रूप ;" वरील सर्व बाजूंचा विचार केला असता गोविंदप्रभु हेच महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात.
परंतु आज महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारांचे झेंडे लावणारे गोविंदप्रभुला विसरले की काय असा ठळक मुद्दा समोर येतो. त्यांच्या ओठी चुकूनही गोविंदप्रभुचे नाव येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या मूळ प्रबोधनकाराला आपण विसरलो तर नाही ना हे समाज प्रबोधनकारांनी लक्षात ठेवणे महत्वाचेमहत्त्वाचे आहे. ज्या रिद्धपूर भूमीत गोविंदप्रभूंनी आपलं उभं आयुष्य परिवर्तनासाठी घातलं त्या ठिकाणाची उपेक्षाच राहिली आहे
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1/qXeZ72qKNigwQ | शीर्षक = श्री गोविंद प्रभू | लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}{{मृत दुवा}}</ref>
 
६३,६६५

संपादने