"इलिनॉर ओस्ट्रॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,२५३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: (७ ऑगस्ट १९३३ – १२ जून २०१२). अमेरिकन राजकीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थ...)
 
No edit summary
(७ ऑगस्ट १९३३ – १२ जून २०१२). अमेरिकन राजकीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला. ओस्ट्रॉम यांना निसर्गत: व वारसाने तसेच सामाईक व खाजगी मालमत्तेवर अधिकार असणाऱ्यांच्या आर्थिक विश्लेषणाबद्दल ऑलिव्हर इ. विल्यम्सन (Oliver E. Williamson) यांच्या बरोबरीने २००९ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.
 
ओस्ट्रॉम यांचा जन्म कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेल्स येथे झाला. वडिल ज्यू, तर आई प्रॉटेस्टंट पंथाची होती. १९५१ मध्ये बेवर्ली हिल्स हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९५४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लॉस अँजेल्ससमधून राज्यशास्त्र विषयात बी. ए. पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढे त्याच विद्यापीठातून १९६२ मध्ये एम. ए. आणि १९६५ मध्ये पीएच. डी. या राज्यशास्त्र विषयातील पदव्या मिळविल्या. १९६३ मध्ये राज्यशास्त्रज्ञ विन्सेंट ओस्ट्रॉम यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.
४०९

संपादने

दिक्चालन यादी