"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,५२६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे – सूरसिंगार संसद संस्थेकडून सूरमणी, गानवर्धन संस्था (पुणे) यांच्यातर्फे स्वर-लय भूषण, सम संस्था (नवी दिल्ली) यांच्याकडून संगीतशिरोमणी, पूर्णवाद प्रतिष्ठानकडून संगीत मर्मज्ञ आणि स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न इत्यादी. याशिवाय त्यांचा पुणे महापालिकेच्या महापौरांकडून गौरवपदक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिल्लीच्या केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे त्यांना संगीताची वरिष्ठ छात्रवृत्ती देण्यात आली होती.
 
सुहासिनीताईंनी भेंडीबाजार घराण्याचे वैभव आपल्या गायकीतून समर्थपणे साकारले. त्यांच्या गानसेवेमुळे भेंडीबाजार हे काहीसे दुर्लक्षित राहिलेले घराणे पुन्हा संगीताच्या प्रवाहात आले आणि या घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम सुहासिनीताईंनी केले. त्यांनी पं. जानोरीकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा गायक-गायिका यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला आणि त्याची रक्कम (देणगी स्वरूपात) गानवर्धन या संगीत प्रचार-प्रसार संस्थेकडे सुपूर्त केली.
३६४

संपादने

दिक्चालन यादी