"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
No edit summary
ओळ १४: ओळ १४:

अभिजात संगीताची आवड समाजातील सर्व स्तरांमध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकांसह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य होते. [[हिंदी भाषा|हिंदी]]-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, [[उपशास्त्रीय संगीत|उपशास्त्रीय संगीता]]<nowiki/>ची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतावर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे [[सौंदर्य]] उलगडणारा ख्याल गायनाचा ‘रसास्वाद’ ही त्यातील काही उदाहरणे होत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्याचे संगीतविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा संगीतकार म्हणून आकाशवाणी व [[दूरदर्शन]] कार्यक्रमात सहभाग असे.

त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे – सूरसिंगार संसद संस्थेकडून सूरमणी, गानवर्धन संस्था (पुणे) यांच्यातर्फे स्वर-लय भूषण, सम संस्था (नवी दिल्ली) यांच्याकडून संगीतशिरोमणी, पूर्णवाद प्रतिष्ठानकडून संगीत मर्मज्ञ आणि स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न इत्यादी. याशिवाय त्यांचा पुणे महापालिकेच्या महापौरांकडून गौरवपदक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिल्लीच्या केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे त्यांना संगीताची वरिष्ठ छात्रवृत्ती देण्यात आली होती.

१२:१५, ७ मार्च २०२० ची आवृत्ती

(३० नोव्हेंबर १९४४ – ७ नोव्हेंबर २०१७). भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व संगीत रचनाकार. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित अभिरूचीसंपन्न कुटुंबात झाला. वडील रामराव हवाईदलात तंत्रज्ञ होते. त्यांच्या नोकरीतील बदलीमुळे कुटुंबाची अनेक ठिकाणी भ्रमंती झाली. अखेर त्यांनी पुणे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला (१९५७).

त्यामुळे सुहासिनीताईंचे सुरुवातीचे शिक्षण बंगलोर, मुंबई व पुणे येथे झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र विषयातून पदवी घेतली (१९६१). पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘संगीताचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रबंध सादर करून ‘संगीताचार्य’ ही संगीतातील सर्वोच्च पदवी संपादन केली (१९६८).

सुहासिनीताईंच्या वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड होती आणि त्यांच्या आई सरलाताई हार्मोनियम व व्हायोलिन वादन आणि गायन शिकल्या होत्या. सुहासिनीताईंचा आवाज सुरेल व त्यांना लय-तालाची जाण चांगली होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना संगीताचे शिक्षण घेण्याकरिता घरातून प्रोत्साहन मिळाले. पुण्यात आल्यानंतर भेंडीबाजार घराण्याचे संगीतज्ञ व गुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडून त्यांना संगीताची शिस्तबद्ध तालीम मिळाली.

गुरुंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वत:ची निरंतर साधना-रियाज यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी त्यातील बारकाव्यांसहित त्या शिकू लागल्या, यांदरम्यान सुहासिनीताईंची प्रकृती बिघडली आणि त्यांची फुफ्फुसे नाजूक असल्याने त्यांना हा रियाज झेपणार नाही असे निदान झाले, तरीही निश्चयपूर्वक त्यांनी ह्या घराण्याची गायकी आत्मसात केली.

आपल्या सुरेल गुंजन आणि मिंडयुक्त आलापींनी रागाचे यथार्थ, सुडौल आणि परिणामकारक रूप त्या रसिकांसमोर साकारत. बंदिशींचे आकर्षक प्रस्तुतीकरण, लयीत गुंफलेली, सरगम आणि गमकयुक्त ताना ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होत. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग या उपशास्त्रीय संगीताचाही सराव केला. बेगम अख्तर यांच्या गायनाच्या ढंगाचा अभ्यास करून स्वत:ची एक खास शैली त्यांनी बनविली.

दिल्लीच्या सुप्रसिद्ध ठुमरी गायिका नैनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचे मार्गदर्शन घेतले. हिंदी व मराठी अभंग, गीत, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. संगीताच्या तालमींबरोबरच त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार परीक्षा दिली व त्या संपूर्ण देशामध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या (१९६६). केंद्रीय विद्यालयात १९६८ पासून संगीत शिक्षिका म्हणून त्यांनी अध्यापन केले. त्याच्या वडिलांच्या निधनाच्या (१९६८) धक्क्यातून सावरून त्यांनी संगीताचार्य ही पदवी संपादन केली. दरम्यान युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेमध्ये त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांची पुणे आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या नोकरीच्या कार्यकाळात त्यांना औरंगाबाद, पणजी, दिल्ली येथेही आकाशवाणीच्या कामानिमित्त जावे लागले.

१९९६ मध्ये त्यांनी आकाशवाणीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि उर्वरित जीवन संगीताच्या प्रचार-प्रसार कार्याला वाहून घेतले. स्वर, लय व शब्द यांचा त्रिवेणी संगम असलेल्या शंभरहून अधिक बंदिशी ‘निगुनी’ या टोपणनावाने बांधणाऱ्या वाग्येयकार म्हणून सुहासिनींचे कार्य अलौकिक स्वरूपात संगीतकारांसमोर आले.

अभिजात संगीताची आवड समाजातील सर्व स्तरांमध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकांसह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य होते. हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतावर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ख्याल गायनाचा ‘रसास्वाद’ ही त्यातील काही उदाहरणे होत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्याचे संगीतविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा संगीतकार म्हणून आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग असे.