"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ९०: ओळ ९०:
१ ग्रंथ संग्रह विक्साचे धोरण ठरविणे.
१ ग्रंथ संग्रह विक्साचे धोरण ठरविणे.
२ विद्यापीठाच्या अभ्यस्क्र्माशी निगडीत विविधं विषयांचे ग्रंथ,नियतकालिक,व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
२ विद्यापीठाच्या अभ्यस्क्र्माशी निगडीत विविधं विषयांचे ग्रंथ,नियतकालिक,व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
३ आंतर ग्रंथालयीन देवाण घेवाण कार्यक्रमातून वाचन साहित्य उपलब्धता करून देणे.
४. संदर्भ ग्रंथाची ओळख करून देणे.
५.ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करणे.
६. विद्यार्थांना करीयर मार्गदर्शन करणे.
७. वर्तमान पत्राची कात्रणे कडून वाचकांना सेवा देणे.
८. मागणीनुसार विषयवार सूची तयार करून देणे.
९. पदव्युत्तर विद्याथ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करायचा असतो, या संदर्भाकरिता सूची कशी तयार करावी, वाड्मय शोध कसा करावा,संदर्भ कसे द्यावेत व संशोधन प्रकल्पाचा आराखडा या संदर्भात मार्गदर्शन करणे.
१०. ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे.
११. ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करणे, तसेच ग्रंथालयाची नियमावली व अंदाजपत्रक तयार करणे.
१२. इंटरनेट च्या माद्यमातून विविधं सेवा पुरविणे.
१३. शिक्षक व संशोधक त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक त्या माहिती सेवा पुरविणे.
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.



१३:०४, १९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

ग्रंथालय म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारण पणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा होय. ग्रंथालय म्हणजे ग्रंथ+ आलंय= ग्रंथालय होय. ग्रंथ संग्रहाचे स्थान म्हणजे ग्रंथालय होय. प्राचीन काळापासून ग्रंथालयांची परंपरा ही भारताला लाभलेली आहे. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्य जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक अशी ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द याठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये ग्रंथालय चळवळ ही सार्वत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने पूरक ठरली. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीच्या माध्यमातून सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. ज्या माध्यमातून लोकांना वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाते. ग्रंथ वाचन साहित्य आणि ग्रंथालय कर्मचारी याचा त्रिवेणी संगम ज्याठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणास ग्रंथालय असे म्हणतात. ग्रंथालायचे वाचक वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथलायचे महत्त्वाचे तीन घटक ओळखलेजातात.ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक ग्रंथालयाची संकल्पना बदलली आहे. ग्रंथालय हे माहितीचे देवाण - घेवाण अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.

   व्याख्या
१  ज्या इमारतीमध्ये अथवा जागेत ग्रंथ,नियतकालिके आणि इतरवाचन साहित्य साधने वाचकांना संदर्भाकरिता अथवा उपयोग करण्याकरितादिली जातात त्या        ठिकाणास ग्रंथालये असे म्हणतात.
२  ग्रंतालय म्हणजे वाचन अभ्यास आणि  संदर्भाकरिता ग्रंथ आणि इतर वाचन साहित्ययाचं संग्रहअशी स्वतंत्र्य जागा ज्या मध्ये वाचन संग्रह केलेला असतो.
३  ग्रंथालय ही एक सर्वजनिक संस्था असून जी ग्रंथसंग्र्हाची निगा राखते व त्यांना जो ग्रंथ हवा असतो त्यांनातो उपयोगाकरिता उपलब्धकरून देते.

शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात.आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे.अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्व मध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसाय नुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालय उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधी आणि सामाजिक मदती च्या अभावे अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो.

कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.

ग्रंथालयतील विविध विभाग १ ग्र्थोपार्जन २ ग्रंथ वर्गीकरण ३ तालीकीकरण ४ देवघेव ५ संदर्भ ६ नियतकालीक

इतिहास

प्राचीन भारतीय विद्यापीठ तक्षशिलेचे ग्रंथालय हे सर्व जगात प्रसिद्ध होते. अनेक ग्रीक तसेच चीनी प्रवासी या ग्रंथालयाला भेट देऊन गेल्याची नोंद सापडते. प्राचीन काळात राजे-राजवाडय़ांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल आहे. १ प्राचीन काळ. प्राचीन काळी इजिप्तआणि अलसरीया शाशकीय कागदपत्रे व धर्मिक वाचन साहित्य अभिलेकागार या स्वरुपात ग्रंथालये अस्तित्व्त होती.ग्रीस व इजिप्त या देशात ग्रंथालय असल्यची नोद आढळते. २ मध्ययुगीन काळ.

मध्ययुगीन मुस्लीम देशामध्येही ग्रंथालये होती.अरब बगदाद येथे मोठ्या प्रमाणात ग्रंथालये होती.

३ आधुनिक काळ

 या कालखंडात विज्ञान प्रसार व विकास झाला. माहिती देवाण घेवाण वाढली संशोधन वाढ झाली शिक्षणातीलवाढ झाली नवनवीन तंत्रज्ञान वाढ झाली.

त्यामळे पारंपारिक ज्ञान साधनाबरोबर डीजीटल ज्ञान साधनाचा उदय झाला. त्यांमुळे आधुनिक ग्रंथालये विकसित झाली.ग्रंथालयात नवीन सेवाचाउदय झाला.

महाराष्ट्रातील ग्रंथालये

पारंपरिक ग्रंथालयांमध्ये देखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे, त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्‍नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्‍नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी). नेटिव्ह जनरलमध्ये बर्‍याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. [ संदर्भ हवा ]

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रामधील ७५ टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत.

ग्रंथालय चळवळीत निरपेक्ष वृत्तीने आणि सामाजिक कर्तव्यभावनेने कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. अनेक ग्रंथालये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजजीवन समृद्ध करीत असतात. भारत सरकारने नॉलेज कमिशन नेमून ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी नवीन धोरण तयार केले.

कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरू झाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार आहेत. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळी शकते. २४ तास सुरू असणारी अभ्यासिकादेखील आहेत.

प्रबोधनासाठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयांची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरू व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकांकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. [ संदर्भ हवा ]

सातारा जिल्ह्यातील ग्रंथालये

सातारा जिल्ह्यामध्ये ४३५ ग्रंथालये आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ चांगलीच भरभराटीला आली असली तरी सातार्‍यातील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. उर्वरित महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अशीच वेगाने विकसित झाली पाहिजे.

महाराष्ट्रातील ग्रंथालय सेवक

राज्यात १२,८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत २२,६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार २० हजार, ‘क' वर्गासाठी ६४ हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख २८ हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख ९२ हजार रुपये वार्षिक अनुदान देत आले आहे.. हे अनुदान एक एप्रिल २०१२ पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा ९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून २९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांचा एकूण मासिक पगार ५९२६ रुपये असतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा ८८८९ रुपये मिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार १५०० रु. होणार. महाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही.

ग्रंथालयांचे प्रकार

  • शैक्षणिक ग्रंथालयाची माहिती
शैक्षणिक ग्रंथालयाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. विविधं कौशल्य प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासात या ग्रंथालयाचे महत्वाचे आहे.
शैक्षणिक ग्रंथालयाची उदिष्टे:

१ शैक्षणिक व सामाजिक घटकांच्या माहिती विषयक गरजांची पूर्तता करणे. २ विविधं प्रकारच्या शैक्षणिकव संदर्भ ग्रंथाचे उपार्जन करून संवर्धन करणे. ३ विविधं अभयाक्रम लागणाऱ्या वाचन साहित्य उपलब्ध करून देणे. ४ वाचकांना वाचनकक्ष सुविधा पुरविणे. ५ वाचकांना दयाव्याच्या माहिती व संदर्भ सेवांचे नियोजन करणे.

१.शालेय ग्रंथालय पाचवी ते दहावी या वर्गा साठी शाळे मध्ये जी विद्यार्थी व शिक्षक यांना शाळेमध्ये जी ग्रंथालये यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध आहेत त्यांना शालये ग्रंथालय असे म्हणतात. आपल्या देशात माध्यमिकस्तरावर शालेय ग्रंथालयेअलीकडील काळात दिसत असले तरी ती शाळेच्या एकूण विद्यर्थी संख्यावर अवलंबून आहेत. शालेय ग्रंथालय ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविणे हे महत्वाचे काम करतात. या मध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकाचे देवघेव करणे,विशीठ माहिती संदर्भ पुरवणे,ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे,विद्याथी यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे.ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे.विविधं स्पर्धाचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे.चर्चा सत्र आयोजित करणे. नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थीयांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीव निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात. २ महाविद्यालय ग्रंथालय महाविदलायात विधार्थी प्राध्यापक यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविदालय ग्रंथालय असे म्हणतात. महाविद्यालय ग्रंथालयाची कार्य. १. विद्यार्थी, प्राधापक यांना क्रमिक पुस्तके व इतरवाचन साहित्य पुरवणे. २.ग्रंथालयात पुस्तके नसल्याने इतर ग्राथाल्यातून आंतर देवघेव द्यारे वाचन साहित्यआणून देणे. ३. ग्रंथालाय्तीन आलेल्या नवीन पुस्तकाचीयाद्या देणे ४. सदर्भ ग्रंथ पुरविणे. ५. वाचकांना मागर्दर्शन करणे. ६. तालीकीकरण व वर्गीकरणकरणे. ७. वाचन विभाग उपलब्ध करून देणे. ८. विशेष दिनादिवशी ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे. ९. संशोधन कर्यात मदतकरणे. १०. विद्यर्थी मध्ये वाचन कौशल्ये विकसितकरणे. ११. करीयर मार्गदर्शन करणे,या संदर्भात स्पेधा परीक्षा विषयी माहिती देणे. आणि या वरीलप्रमाणे सर्व ग्रंथ आणि नियतकालिक यांची माहिती पुरविणे. १२ वृत्तपत्र कात्रणे काढून अद्यावत माहिती शिक्षक व विद्यार्थी यांना पुरविणे. १३ ग्रंथालयाचा उपयोगाकरिता मार्गदर्शन करणे. १४. संदर्भ ग्रंथ यांचीमाहिती देऊन त्यातील मजकूर व त्या ग्रंथाचा उपयोग कसा करावयाचा याविषयी मार्गदर्शन करणे. १५ विविधं विषयांच्या मागणीनुसार सूचीतयार करून विद्यर्थीयांना उपलब्ध करून देणे. १६ ग्रंथ मंडळाची स्थापना करणे.व ग्रंथावर चर्चा सत्रे आयोजित करणे.

३ विदयापीठ ग्रंथालय

विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
 विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविधं ज्ञानशाखा तिल विद्यार्थी शिक्षक व संशोधक यांच्या करिता निर्माण केलेली  ग्रंथालय प्रणाली होय.  विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यर्थी शिक्षक वर्ग,संशोधन करणारे विद्यार्थी, सलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग , बहीस्थ विद्यर्थी स्थनिक नागरिक,शासकीय अधिकारी इत्यादी असतात.
      या ग्रंथालयातून अभ्यासकांना विविधं  प्रकारच्या ग्रंथालयीनमाहिती सेवा व डीजीटल वाचन साहित्याच्य साह्याने पुरविल्या जातात.
विद्यापीठ ग्रंथालयाची कार्य.

१ ग्रंथ संग्रह विक्साचे धोरण ठरविणे. २ विद्यापीठाच्या अभ्यस्क्र्माशी निगडीत विविधं विषयांचे ग्रंथ,नियतकालिक,व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे. ३ आंतर ग्रंथालयीन देवाण घेवाण कार्यक्रमातून वाचन साहित्य उपलब्धता करून देणे. ४. संदर्भ ग्रंथाची ओळख करून देणे. ५.ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करणे. ६. विद्यार्थांना करीयर मार्गदर्शन करणे. ७. वर्तमान पत्राची कात्रणे कडून वाचकांना सेवा देणे. ८. मागणीनुसार विषयवार सूची तयार करून देणे. ९. पदव्युत्तर विद्याथ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करायचा असतो, या संदर्भाकरिता सूची कशी तयार करावी, वाड्मय शोध कसा करावा,संदर्भ कसे द्यावेत व संशोधन प्रकल्पाचा आराखडा या संदर्भात मार्गदर्शन करणे. १०. ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे. ११. ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करणे, तसेच ग्रंथालयाची नियमावली व अंदाजपत्रक तयार करणे. १२. इंटरनेट च्या माद्यमातून विविधं सेवा पुरविणे. १३. शिक्षक व संशोधक त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक त्या माहिती सेवा पुरविणे.

  • सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.


  सार्वजनिक ग्रंथालय
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण,संस्कृती,माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकामध्ये व विविधं देशामध्ये सामंजस्य निर्माण करणारीअत्यावश्यक संथा होय.

सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश ,वर्ण,वर्ग,असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पर्व ग्रह शिवय निरपेशपणे मोफत किवां अल्प वर्गणी घेवून उपलब्ध करून दिले जाते त्या ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात. या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सर्वजनिक निधीतून केली जाते.ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात. सार्वजनिक ग्रंथालयाची कार्य. १ ग्रंथालयज्या टिकाणी आहे त्या परिसरातीलवाचकांची ,आवड, गरज आणि त्याचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिक व दृक्श्राव्य साधनाचे संकलन करणे. २. विद्यार्थी व शिक्षकाना क्रमिक पुस्तक व संदर्भ पुरविणे ३. संशोधक व अभ्यासक यांना अद्यावत वाचन साहित्य उपलब्ध करून देणे. ४. साक्षरता प्रसारासाठीविविधं प्रकारचे उपक्रम आयोजित करणे. ५. अनौपचारिक शिक्षणासाठी व निरंतरशिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. ६. थानिक परिसरातीलवस्तू हस्त कला ई. जतन करणे. ७. समाज प्रबोधनासाठी विविधं प्रकारचे व्याख्यान मला ,परीसव्वाद ,नाटक ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे. ८. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र तिल माहिती जनसामान्य पर्यंत पोहचविणे या साठी विज्ञान विषयक व्य्खाने परिसंवाद ई. सारखे उपक्रम आयोजित करणे. ९.बालकासाठी व महिलासाठी स्वतन्त्र दालन उपलब्ध करून देणे व त्याच्या साठी लागणारे वाचन साहित्य संग्रहित करणे व त्याच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. १० माहिती केद्र म्हणून काम करणे. ११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे. १२ सामाजिक , शिक्षण ,व सांकृतिक कार्य सार्वजनिक ग्रंतालय करते. १३ सर्व नागरिकांना स्वय शिक्षणासाठी मदत करणे.

१ राष्ट्रीय ग्रंथालय

   राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंतालय म्हणून ओळखले जाते. राट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतगत प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्व पूर्ण प्रकाशनाचे संकलनव जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात  डीलीव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार  देशातील प्रतेक प्रकाशकाने आपले प्रकाशन  नाची ३ प्रती या  ग्रंथालयास विनामुक्य पोष्टाने पाठवा व्या लागतात.
   भारताचे  राष्ट्रीय ग्रंथालय  हे कलकत्ता येथे आहे. यां ग्रंथालय मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातो. समाजातील सर्व घटकातील लोकांना या मध्ये विनामुल्य प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद ण करता प्रवेश दिला जातो.
   राष्ट्रीय ग्रंथालय  कार्य.

१. भारतातील सर्व भाषा मधील प्रकाशित झालेली सर्व ग्रंथ संग्रहित करणे. २. राट्रीय सुचीय माहिती केंद्रीय म्हणूनकार्य करणे. ३ संघ तालिका म्हणून काम करणे. ४. ठराविक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूची निर्मिती करणे. ५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे. ६. शासनास लागणारी व वेळो वेळी लागणारी माहिती पुरविणे. ७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यस उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे. ८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविधं वाचन साहित्याची माहिती समाजातील घटका पर्यत पोहचविणे. ९ ह्स्तलीकीताचे आधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने जतन करणे. १० इतर देशातील राट्रीय ग्रंथाल्याब्रोबर प्रकाशनाचीदेवाण घेवाण करणे.

  • ऐतिहासिक ग्रंथालये
  • व्यक्तिगत ग्रंथालये
  • लोक ग्रंथालये
  • विशेष ग्रंथालये

१ अंध ग्रंथालये

  अंध वाचकासाठी  ब्रेल लिपी मधील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते त्यास अंध ग्रंथालयअसेम्हणतात.

२ रुग्णालय ग्रंथालये

  रूग्णालयात जे रुग्ण उपचारासाठी आड मिट केले जातात आणि त्यांना जी पुस्तकउपलब्ध करून दिलीजातात 

३ काराग्राहीन ग्रंथालये

 जे गुन्हेगार यांना कारागृहात ठेवले जातात आणि त्यांना शिक्षा भोगतअसतात त्यांना ग्रंथ पुरवले जातात 

४ दैनिक ग्रंथालये ५ संशोधन ग्रंथालये

या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे,

  • कायदा विषयक ग्रंथालये
  • वैद्यकीय ग्रंथालये

हेही पाहा

बाह्य दुवे

ग्रंथालयांची सूची

अन्य संसाधने