"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎हे सुद्धा पहा: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २८: ओळ २८:


परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले.

परभणी शहरातील आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे '''पारधेश्वर महादेव मंदिर'''. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला '''पारद शिवलिंग''' असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे.
या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

११:०६, १२ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

हा लेख परभणी शहराविषयी आहे. परभणी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?परभणी

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १६′ ००″ N, ७६° ४७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४०७ मी
जिल्हा परभणी
लोकसंख्या २,५९,१७० (2001)
खासदार संजय उर्फ बंडू जाधव
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 431401
• MH 22

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये उरूस भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, वेगवेगळी प्रदर्शने व त्यांची विक्री केली जाते. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले.

परभणी शहरातील आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे पारधेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला पारद शिवलिंग असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे. या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.

हे सुद्धा पहा

परभणीपासून जवळच गंगाखेड हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे जनाबाईची समाधी आहे. तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत. तसेच परभणी पासून जवळच पाथरी येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुध्दा आहे. ञिधारेला तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओँकारनाथ भगवान या सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.