"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग
छो
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग
 
====ब्रह्मगुप्त====
७व्या शतकामधील भारतीय गणितज्ञ व [[खगोलशास्त्रज्ञ]] [[ब्रह्मगुप्त]] ह्याच्या मते [[पृथ्वी]] गोलाकार होती. हा दृष्टिकोन तत्कालीन पृथ्वी सपाट अथवा पोकळ असल्याच्या पौराणिक दृष्टिकोनाच्या विपरीत होता. ब्रह्मगुप्ताने सांगितल्या प्रमाणे :
<blockquote><p>"परंतु तसे [पृथ्वी गोल] नसल्यास पृथ्वी स्वर्गाच्या व वेळेच्या प्रणांशी एकविध व समान गती ठेवण्यास असफल राहील. [...] '''सर्व भारी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात.''' [...] पृथ्वी सर्व बाजूने समान आहे; पृथ्वीवर सगळे जण सरळ उभे राहतात, आणि प्रकृतीच्या नियमानुसार सगळ्या भारी वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात, कारण '''वस्तूंना आकर्षित करणे व जवळ ठेवणे ही पृथ्वीची प्रवृत्ती आहे''', जशी पाण्याची वाहण्याची, अग्नीची जळण्याची व वाऱ्याची वाहण्याची प्रवृत्ती आहे. [...] पृथ्वी ही एकमेव खालची वस्तू आहे व वस्तू नेहमी तिच्याकडे परत येतात; तुम्ही त्यांना कोणत्याही दिशेत फेका, त्या कधी पृथ्वीपासून वरती जात नाहीत."<ref>ब्रह्मगुप्त, ब्रह्मस्फुटसिद्धान्त (६२८)</ref> </p>
</blockquote>
 
====भास्कराचार्याची संकल्पना====
११व्या शतकातील गणितज्ञ भास्कराचार्याने[[भास्कराचार्य|भास्कराचार्या]]<nowiki/>ने आपल्या 'सिद्धान्त शिरोमणि' ह्या ग्रंथात लिहिले:
<blockquote> <p>"आकृष्टशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखः स्वशक्त्या।</p>
<p>आकृष्ट्यते तत्पततीव भाति समेसमान्तान् क्व पतत्वियं खे॥"<ref>http://chestofbooks.com/health/india/Sushruta-Samhita/images/Siddhanta-Shiromani-Bhaskaracharyaya-Golodhyava.jpg</ref></p> </blockquote>
 
==== गॅलेलिओची संकल्पना व प्रयोग ====
[[गॅलिलिओ]] याने १६व्या शतकाच्या शेवटी आणि १७व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात गुरुत्वाकर्षणाबद्दल आपली मते मांडली. उंचावरून टाकलेले लहान मोठ्या आकाराचे दगड कसे एकाच वेळी आणि सरळ रेषेत खाली पडतात, उतारावरून गोल वस्तू कशा गडगडत खाली येतात आणि जोराने हवेत भिरकावल्यावर कुठलीही वस्तू कशा प्रकारच्या वक्ररेषेत पुढे जात जात खाली येते या सगळ्या क्रियांचे त्याने अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. छपराला लटकणारे दिवे कसे लयीमध्ये झुलतात ते पाहिले आणि त्या दिव्यांचा झोका लहान असो वा मोठा. त्याला तितकाच वेळ लागतो हे सिद्ध केले. घोड्याच्या मदतीने चालणारा पाणी उपसण्याचा पंप आणि पाण्याच्या दाबावर काम करणारा तराजू अशा प्रकारची उपकरणे त्याने बनवली. पृथ्वीच्या गिरकीमुळे समुद्रात लाटा उठत असाव्यात अशा अर्थाचा एक विचार त्याने मांडला होता, पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर लाटांचे खरे रहस्य जगाला कळले आणि तो विचार मागे पडला. {{संदर्भ हवा}}
 
==== केप्लरचे नियम आणि गुरुत्वाकर्षण ====
३०८

संपादने

दिक्चालन यादी