"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३३५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
==अभिनय==
गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘[[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]]’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘[[संगीत उग्रमंगल|उग्रमंगल]]’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी [[मास्टर (कलावंत)|मास्टर]] हे उपपद लावले.
 
 
==निधन==
 
मा. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले.
 
==मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी