"मधुमालती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १०: ओळ १०:
मधुमालतीला वर्षभर तुरळक फुले येतात पण मुख्य बहर उन्हाळ्यात असतो . फुले फांदीच्या टोकावर गुच्छाने येतात आणि झाडावर दोन तीन दिवस टिकतात. मधुमालतीच्या फुलांना गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरवा लांब देठ असतो. फुलांची लांबी अडीच ते तीन सें मी असते. फुले रात्री उमलतात. उमलताना त्यांचा  रंग पांढरा असतो पण हळूहळू एक दोन दिवसात तो बदलत बदलत फिकट गुलाबी, गुलाबी आणि शेवटी तांबडा होतो. त्यामुळे झाडावर एकच वेळी पांढरी, फिकट गुलाबी, गुलाबी आणि तांबडी फुले दिसतात आणि असा बहरलेला वेल बहुरंगी दिसतो. सुरुवातीस फुले आडवी असतात पण नंतर ती जमिनीकडे झुकतात. फुलांचे परागीभवन कीटकांद्वारे व पक्षांद्वारे  होते. वेगवेगळ्या रंगांच्या फुलामुळे वेगवेगळे कीटक व पक्षी फुलांकडे आकर्षित होतात. फुले सुवासिक असतात आणि त्यांचा आसमंतात दरवळणारा सुगंध दूरवरही जाणवतो.

फुले गळून पडल्यावर त्याजागी फळे येतात. मात्र महाराष्ट्रात ह्या झाडाला फळे आलेली क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे बियांमुळे नवीन झाड तयार करता येत असले तरी महाराष्ट्रात मात्र फांदीपासून छाट कलमाने नवीन रोपे तयार केली जातात. ह्या झाडाच्या मुळाला नवीन फुटवे येतात ते तेथून काढून दुसरीकडे लावल्यास नवीन झाड तयार होऊ शकते. ही फळे चीन इंडोनेशिया अशा काही देशात औषधी समजली जातात.<ref name=":0" />
फुले गळून पडल्यावर त्याजागी फळे येतात. मात्र महाराष्ट्रात ह्या झाडाला फळे आलेली क्वचितच पाहायला मिळतात<ref name=":0" />. त्यामुळे बियांमुळे नवीन झाड तयार करता येत असले तरी महाराष्ट्रात मात्र फांदीपासून छाट कलमाने नवीन रोपे तयार केली जातात. ह्या झाडाच्या मुळाला नवीन फुटवे येतात ते तेथून काढून दुसरीकडे लावल्यास नवीन झाड तयार होऊ शकते. ही फळे चीन इंडोनेशिया अशा काही देशात औषधी समजली जातात.<ref name=":0" />

== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

१८:०८, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

" | मधुमालती
[[चित्र:
मधुमालती
]]
" | शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कॉम्ब्रेटम
जात: सी.इंडिकम
वर्ग: युडीकॉटस
कुळ: कॉम्ब्रेटसी
शास्त्रीय नाव
कॉम्ब्रेटम इंडिकम

मधुमालती ( इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे.

मधुमालती हा एक आशियात सर्वत्र आढळणारा सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्रवेशद्वारापुढील मांडव असा कोणताही आधार मिळाल्यास तो आठ ते दहा मीटरपर्यंत विस्तारू शकतो. बहराच्या काळात लालपांढऱ्या  फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास त्याची आणखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.[१] त्यामुळे तो बागांमध्ये तसेच घराच्या आसपास मुद्दाम लावला जातो.

ह्या वेलाच्या मधुमालती ह्या नावाची इतरही काही झाडांशी गल्लत होण्याची शक्यता असते. माधवी (  Hiptage Benghalensis) ह्या झाडालाही भारतात काही ठिकाणी मधुमालती हे नाव आहे[२]. गणेशपूजेसाठी जी 21 प्रकारची पत्री वाहीली जाते त्यामध्ये मधुमालती असे नाव आहे पण प्रत्यक्षात ते झाड मालती किंवा चमेली ( Jasminum Gradiflorum )  म्हणजे ह्या मधुमालतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.[३]

मधुमालतीची पाने गर्द हिरवी आणि फांदीवर समोरासमोर असतात. पानांचा आकार एकूणच लंबवर्तुळाकार म्हणजे देठाकडे गोलाकार  पण टोकाला निमुळता होत गेलेला ( acuminate) असून लांबी साधारण ७ ते १५ सें मी असते.

मधुमालतीला वर्षभर तुरळक फुले येतात पण मुख्य बहर उन्हाळ्यात असतो . फुले फांदीच्या टोकावर गुच्छाने येतात आणि झाडावर दोन तीन दिवस टिकतात. मधुमालतीच्या फुलांना गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरवा लांब देठ असतो. फुलांची लांबी अडीच ते तीन सें मी असते. फुले रात्री उमलतात. उमलताना त्यांचा  रंग पांढरा असतो पण हळूहळू एक दोन दिवसात तो बदलत बदलत फिकट गुलाबी, गुलाबी आणि शेवटी तांबडा होतो. त्यामुळे झाडावर एकच वेळी पांढरी, फिकट गुलाबी, गुलाबी आणि तांबडी फुले दिसतात आणि असा बहरलेला वेल बहुरंगी दिसतो. सुरुवातीस फुले आडवी असतात पण नंतर ती जमिनीकडे झुकतात. फुलांचे परागीभवन कीटकांद्वारे व पक्षांद्वारे  होते. वेगवेगळ्या रंगांच्या फुलामुळे वेगवेगळे कीटक व पक्षी फुलांकडे आकर्षित होतात. फुले सुवासिक असतात आणि त्यांचा आसमंतात दरवळणारा सुगंध दूरवरही जाणवतो.

फुले गळून पडल्यावर त्याजागी फळे येतात. मात्र महाराष्ट्रात ह्या झाडाला फळे आलेली क्वचितच पाहायला मिळतात[१]. त्यामुळे बियांमुळे नवीन झाड तयार करता येत असले तरी महाराष्ट्रात मात्र फांदीपासून छाट कलमाने नवीन रोपे तयार केली जातात. ह्या झाडाच्या मुळाला नवीन फुटवे येतात ते तेथून काढून दुसरीकडे लावल्यास नवीन झाड तयार होऊ शकते. ही फळे चीन इंडोनेशिया अशा काही देशात औषधी समजली जातात.[१]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ a b c https://www.loksatta.com/balmaifalya-news/rangoon-creeper-flower-plant-1512364/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "Hiptage benghalensis". issg.org; Global Invasive Species Database. Retrieved 2007-06-27. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80. Missing or empty |title= (सहाय्य)