"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→विभाग आणि संशोधन केंद्रे: योग्य नाव जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
→बाह्य दुवे: योग्य नाव जोडलं खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ८४: | ओळ ८४: | ||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
* [http://unipune.ac.in पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ] |
* [http://unipune.ac.in सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ] |
||
* पत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत. |
* पत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत. |
||
{{पुणे}} |
{{पुणे}} |
||
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}} |
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}} |
||
[[वर्ग:पुणे विद्यापीठ| ]] |
[[वर्ग:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ| ]] |
||
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]] |
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]] |
||
[[वर्ग:पुणे]] |
[[वर्ग:पुणे]] |
१०:५७, ६ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
ब्रीदवाक्य | यः क्रियावान् स पण्डितः |
---|---|
Type | शासकीय शैक्षणिक आस्थापना |
स्थापना | इ.स. १९४८ |
विद्यार्थी | १,७०,००० |
संकेतस्थळ | www.unipune.ac.in |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ आहे.
मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
- ४६ शैक्षणिक विभाग आहेत.
- ४७४ महाविद्यालये आणि
- सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.
इतिहास
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळे व जळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू
- बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर (इ.स. १९४८ ते १९५६)
- रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१९५६ ते १९५९)
- प्राचार्य दत्तात्रेय गोपाळ कर्वे (१९५९ ते १९६१)
- महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१९६१ ते १९६४)
- न.वि. गाडगीळ (१९६४ ते १९६६)
- डॉ. धनंजयराव गाडगीळ (१९६६ ते १९६७)
- ह.वि. पाटसकर (१९६७ ते १९७०)
- डॉ. बा.पां आपटे (१९७० ते १९७२)
- प्राचार्य डॉ. ग.स. महाजनी (१९७२ ते १९७५)
- प्राचार्य देवदत्त दाभोळकर (१९७५ ते १९७८)
- डॉ. राम ताकवले (१९७८ ते १९८४)
- डॉ. वि.ग. भिडे (१९८४ ते १९८९)
- डॉ. श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (१९८९ ते १९९५)
- डॉ. वसंत गोवारीकर (१९९५ ते १९९८)
- डॉ. अरुण निगवेकर (१९९८ ते २०००)
- डॉ. अशोक कोळस्कर (२००१ ते २००६)
- डॉ. नरेंद्र जाधव (२००६ ते २००९)
- डॉ. रघुनाथ शेवगावकर (२०१० ते २०११)
- डॉ. वासुदेव गाडे (२०१२ ते २०१७)
- डॉ. नितीन करमाळकर (१८ मे २०१७पसून)
नामविस्तार
इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]
नामविस्तारानंतरही
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.[२]
अध्यासने
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.
विभाग आणि संशोधन केंद्रे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले स्त्री अभ्यास केंद्र
- मराठी विभाग
- हिंदी विभाग
- अध्यापनशास्त्र आणि विस्तार विभाग
- अर्थशास्त्र विभाग
- संरक्षण शास्त्र आणि सामरिक शास्त्र
- इंग्रजी विभाग
- पाली भाषा विभाग
- प्रगत संस्कृत अध्यापन केंद्र
- ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग
ग्रंथालय
संदर्भ आणि नोंदी
- ^ आयबीएन लोकमत http://www.ibnlokmat.tv/?p=104234. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.loksatta.com/pune-news/students-waiting-for-updated-certificates-1238117/
बाह्य दुवे
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ
- पत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत.