५७,२९९
संपादने
No edit summary |
No edit summary |
||
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व [[भडोच]]चे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी [[अमरावती]] जिल्ह्यातील [[देऊळवाडा]] येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ७</ref>
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव [[रिद्धिपूर|ऋद्धिपूर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभू]] दिसले. [[गोविंदप्रभू|गोविंदप्रभूंपासून]] हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.<ref name="leela7"/> याचवेळी [[गोविंदप्रभु|गोविंदप्रभूंनी]] त्यांना चक्रधर हे नाव दिले.<ref>संकपाळ (२००९) पृ. १२</ref>
==एकाकी भटकंतीचा काळ==
|
संपादने