"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
→‎गाजलेली गीते (सुमारे ४००): अनावश्यक मजकूर काढला
ओळ ६५: ओळ ६५:
* [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान|शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे]] दिलेला [[राम कदम]] कलागौरव पुरस्कार (२००६)
* [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान|शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे]] दिलेला [[राम कदम]] कलागौरव पुरस्कार (२००६)


==बाह्य दुवे==
==गाजलेली गीते (सुमारे ४००)==
* अंगणात रंगली गं
* अगं नाच नाच राधे
* अन् हल्लगीच्या तालावर
* अप्सरा स्वर्गातुन आली
* अमुचा देश महान
* अरे मनमॊहना
* अशी कशी ओढ बाई
* अष्टविनायका तुझा
* असावा असा सुखी संसार
* अहो अहो कारभारी हो
* आई उदे गं अंबाबाई
* आकाशी झेप घे रे पाखरा
* आज प्रीतिला पंख हे लाभले रे
* आधार तू जीवनी
* आमचा राजू का रुसला
* आम्ही चालवू हा पुढे
* आली आली हो भागाबाई
* आली ठुमकत नार लचकत
* आल्या नाचत नाचत
* आवडतो मज आवढतॊ
* इथे मिळाली सागर-सरिता
* उई साजण आला
* उठा उठा हो सूर्यनारायणा
* उद्योगाचे घरी देवता
* ऊठ पांडुरंगा आता
* एक लाजरा न्‌ साजरा
* एकतारिसंगे एकरूप झालो
* ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
* ओवाळिते मी लाडक्या
* कधी तू हसावे, कधी तू रुसावे
* करी दिवसाची रात माझी
* कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली
* कसं काय पाटील बरं हाय का?
* का हासला किनारा
* किती सांगू मी सांगू कुणाला ----
* कुठं कुठं जायचं हनिमूनला
* कुणी ग बाई मारली
* कुण्या गावाचं आलं पाखरू
* कोण होतीस तू काय झालीस
* गं बाई बाई झोंबतो गारवा
* गणगौळण झाली सुरू
* गणपती तू गुणपती तू
* गळ्यात माझ्या बांधा एक
* गुलजार गुलछडी नटून मी
* गोऱ्या गोऱ्या टाचंत काटा
* घेऊ कसा उखाणा
* घेऊन मैफलीचा रात्रीतला
* घेऊन रूप माझे
* चंदनाच्या देव्हाऱ्यात
* चंद्र आहे साक्षिला
* चंद्र होता साक्षीला
* चंद्रातुनी तुझ्या या
* चांदण्यात ह्या धरणी
* छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
* जय गणनायक सिद्धीविनायक
* जय जय हो महाराष्ट्राचा
* जागे व्हा मुनिराज
* जीवन गगन मी पाखरू
* झन झननन छेडिल्या तारा
* टाळ बोले चिपळीला
* ठुमकत आल्या किती गौळणी
* तांडा चालला रे गड्या
* तुझे रूप राणी कुणासारखे गं?
* तुझ्या प्रीतिची लागे गोडी
* तुम्हांवर केलि मि मर्जि
* तू उदास का
* तू ... मी ... रे साजणा
* दाम करी काम येड्या
* दिसला गं बाई दिसला
* दूर राहुनी पाहु नको रे
* दे रे कान्हा चोळी अन लुगडी
* देवमानुस देवळात आला
* देवापुडं मानूस पालापाचोळा
* देश हा देव असे माझा
* देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
* धनगराची मेंढरं गा
* धनी तुमचा नि माझा
* धन्य हा सावित्रीचा चुडा
* धागा जुळला, जीव भुलला
* धुंद आज डोळे
* धुंद एकांत हा
* धुंद ही हवा तरी फूल
* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
* धुंदीत गाऊ मस्तीत राहू
* नका तोडू पावणं जरा
* नाच ग घुमा कशी मी
* नाचतो डोंबारी रं
* नाचू कशी, लाजू कशी, कंबर लचकली
* निसर्गराजा ऐक सांगते
* निळे गगन निळी धरा
* पानापानात दिसतो कान्हा
* पाहुनी प्यारभरी मुसकान
* पिकल्या पानाचा देठ
* प्रभू सोमनाथा
* प्रेमाला उपमा नाही
* फुलं स्वप्‍नाला आली ग
* फूलपाखरू झालो रे मी
* बाई बाई मन मोराचा
* बाजार फुलांचा भरला
* बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
* ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
* मथुरेला कृष्ण निघाला
* मनासारखे झाले माझ्या
* मनोगतांचे उंच मनोरे
* मला इष्काचि इंगळी डसली
* मला न कळते सारेगम
* मला लागली कुणाची उचकी
* मला हे दत्तगुरू दिसले,
* मला हो म्हनत्यात लवंगी मिरची
* माझी प्रिया हसावी
* माझ्या भावाला माझी माया
* माणूस तुझे नाव
* मी आज फूल झाले
* मी जलवंती मी फुलवंती
* मी सुखाने नाहले
* मैत्रिणींनो थांबा थोडं
* मोरया..मोरया..
* या नव्या सुखाला काय
* या मीलनी रात्र ही रंगली
* या रावजी बसा भावजी
* रवि आला हो रवि आला
* राजसा घ्यावा गोविंद विडा
* राजा ललकारी अशी रे
* राया मला जरतारी शालू
* रुणझुणत्या पाखरा
* लाजले मी लाजले
* लेक माझी लाडकी तू
* वारा गाई गाणे
* विठू माउली तू माउली जगाची
* वेगळ्या जगात या
* वेडी खुळी ही प्रीत मला
* शंकरा करुणाकरा
* शुभंकरोति म्हणा मुलांनो
* शोधितो राधेला गोपाल
* श्रीरामाच्या पूजेसाठी आज
* सख्या रे घायाळ मी हरिणी
* सख्या हो आज मला सावरा
* सजणी ग भुललो मी
* सत्यम शिवम सुंदरा
* सत्य शिवाहुन सुंदर हे
* संसार-मंदिरी या आता
* संसार मांडते मी
* संसार हा सुखाचा
* सांग सखे मी चोर कसा
* साधी भोळी राणी
* सांभाळ दौलत सांभाळ
* सावधान होई वेड्या
* सुंबरान गावू चला
* सूर्यदेव आला
* सोळावं वरीस धोक्याचं गं
* स्वप्‍नांत रंगले मी
* स्वप्‍नात साजणा येशील का
* हलके हलके जोजवा
* हवास मज तू हवास तू
* हसले फसले हरवून मला
* हा दैवगतीचा फेरा
* हा सागरी किनारा
* हाती नाही येणे
* हिरवा निसर्ग हा भवतीने
* हिशोब सांगते ऐका
* ही कशानं धुंदी आली
* ही तुमची भारतमाता
* ही दुनिया हाय एक जतरा
* हे देवा तुझ्या दारी आलो
* होम स्वीट होम


== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Jagdish_Khebudkar | शीर्षक = जगदीश खेबुडकर यांची गीते | प्रकाशक = आठवणीतली-गाणी.कॉम | भाषा = मराठी }}
* {{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Jagdish_Khebudkar | शीर्षक = जगदीश खेबुडकर यांची गीते | प्रकाशक = आठवणीतली-गाणी.कॉम | भाषा = मराठी }}



१०:२६, १२ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

जगदीश खेबुडकर
जन्म नाव जगदीश खेबुडकर
जन्म मे १०, इ.स. १९३२
खेबवडे, हळदी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मे ३, इ.स. २०११
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र गीतकार, कविता, साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना,
प्रसिद्ध साहित्यकृती पिंजरा या मराठी चित्रपटातील गीते
अपत्ये अभंग, मुक्तछंद ही मुले, कविता पडळकर, अंगाई महाजनी या मुली
पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित

जगदीश खेबुडकर (मे १०, इ.स. १९३२ - मे ३, इ.स. २०११) हे मराठी गीतकार होते.

जीवन

खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मढेर्कर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]

त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.

त्यांच्या कारकीर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले.[१]

संस्था

इ.स. १९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये रंगतरंग व इ.स. १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

जगदीश खेबुडकर यांना ६०हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

  • राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)
  • गदिमा पुरस्कार
  • कोल्हापूरभूषण पुरस्कार
  • फाय फाउंडेशन पुरस्कार
  • साहित्य सम्राट पुरस्कार
  • रसरंग फाळके पुरस्कार
  • व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार
  • शिवाजी सावंत पुरस्कार [२]
  • बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
  • जीवनगौरव पुरस्कार
  • शाहू पुरस्कार
  • करवीर भूषण
  • दूरदर्शन जीवनगौरव
  • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार
  • शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे दिलेला राम कदम कलागौरव पुरस्कार (२००६)

बाह्य दुवे

  • https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Jagdish_Khebudkar. Missing or empty |title= (सहाय्य)

संदर्भ

  1. ^ Maharashtra Times. 2011-05-03 https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/8151549.cms. 2018-07-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Maharashtra Times. 2004-09-17 https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/-/articleshow/8152196.cms. 2018-07-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)