"हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
पान काढा
ओळ ३४: ओळ ३४:
| संकेतस्थळ = [http://www.harsshitabhiraj.com/ हर्षितअभिराज.कॉम]
| संकेतस्थळ = [http://www.harsshitabhiraj.com/ हर्षितअभिराज.कॉम]
| तळटिपा =
| तळटिपा =
}}{{पान काढायची विनंती|कारण=जाहिरातबाजी, व्यक्तिची उल्लेखनीयता प्रश्नांकित}}
}}

'''हर्षित अभिराज''' ([[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]] - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.
'''हर्षित अभिराज''' ([[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]] - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.



०६:२६, ११ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

हर्षित अभिराज
जन्म २२ ऑगस्ट, इ.स. १९७२
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, पार्श्वगायक, गीतकार
संगीत प्रकार मराठी पॉप संगीत
वाद्ये हर्मोनिअम
प्रसिद्ध आल्बम दूरच्या रानात केळीच्या बनात
निशिगंध
प्रसिद्ध रचना दूरच्या रानात केळीच्या बनात , सोडा राया नाद खुळा , बाप्पा मोरया , माझी मुलगी , मैनेची हवा ,आई तुझा गोंधळ मांडिला, चितेसारखे जाळ मला , लहरत लहरत , जीव तुटतो मैतरा , मला लागलय सोळावं साल , भूपाळी खंडोबाची
प्रसिद्ध चित्रपट अंगारकी, मास्तर एके मास्तर, आंदोलन
प्रभावित ओ पी नय्यर
वडील नाभिराज
आई विलासमती
पत्नी सुचेता
अपत्ये तन्वी

हर्षित अभिराज (२२ ऑगस्ट, इ.स. १९७२ - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.

कारकीर्द

ना.धों. महानोर यांच्या दूरच्या रानात केळीच्या बनात यातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी डॉ. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निशिगंध या मराठी अल्बमसाठी संगीत दिले. आजपर्यंत हरिहरन, कैलाश खेर, जावेद अली, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, परुपल्ली रंगनाथ, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा वैशंपायन, अर्चना आणि प्रार्थना ( ज्युनियर बेंगलोर सिस्टर्स), अभिलाषा चेल्लम, अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला आहे.

रेडिओ मिर्ची 98.3च्या मिर्ची म्युझिक अवार्डसाठी ते परीक्षक असतात.

अल्बम

  • ओम नमो भगवते वासुदेवाय
  • कथा खंडोबाची
  • गाता गाता शिकू
  • जय जय महावीरा
  • दूरच्या रानात केळीच्या बनात
  • नकोशी
  • नवकार महामंत्र
  • नवनाथ मंत्र
  • निशिगंध
  • भक्तामर स्तोत्रम
  • भूपाळी आणि कथा खंडोबाची
  • मंत्र संग्रह
  • माझी मुलगी
  • या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
  • स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ )

हर्षित अभिराज यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट

  • अंगारकी
  • आंदोलन
  • कर्तबगार
  • काळूबाई भक्त धावजी पाटील
  • जय जय रघुवीर समर्थ
  • ज्योतिबा सावंत
  • डोंबारी
  • मास्तर एके मास्तर
  • वर्तमान
  • हिच्यासाठी काय पण


रंगमंचीय सादरीकरण

  • आम्ही दोघे
  • दूरच्या रानात - एक सुरेल सफर
  • नातं तुझं माझं
  • रुणुझुणु वारा रिमझिम धारा

पुरस्कार

  • उत्कृष्ट संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार "नकोशी" या अल्बमला मिळाला .
  • अभिजित दादा कदम फौन्डेशन चा "विशेष गीतकार आणि संगीतकार" पुरस्कार.
  • राजेश खन्ना स्मृती पुरस्कार.
  • राजा गोसावी स्मृती पुरस्कार.

बाह्य दुवे