"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे दुरुस्ती
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४९: ओळ ४९:
[[वर्ग:बांगलादेशचा इतिहास]]
[[वर्ग:बांगलादेशचा इतिहास]]
[[वर्ग:भारत-पाकिस्तान फाळणी]]
[[वर्ग:भारत-पाकिस्तान फाळणी]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटना]]


[[it:Storia dell'India#L'indipendenza e la partizione dell'India]]
[[it:Storia dell'India#L'indipendenza e la partizione dell'India]]

१८:५१, २४ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

१९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा भारत, ब्रह्मदेश, (म्यानमार, श्रीलंका, व पाकिस्तान (पूर्व पाकिस्तान व आजचा बांग्लादेश आदींचा समावेश होता.)

अखंड हिंदुस्थानची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले.

फाळणीपूर्वी

फाळणीबाधित लोक पंजाब‌मधील एका ट्रेनवर
फाळणीबाधित लोक

फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.

फाळणी प्रक्रिया

प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकार्‍याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. जुलै १८, १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला.

लोकस्थलांतर

फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे १.४५ कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण १० लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. फाळणीनंतरही देशातील एकूण मुसलमानांपैकी १/३ मुसलमान आजच्या भारतात राहिले.

फाळणीला गांधीजीनी मान्यता दिली होती.

परिणाम

हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.

  • नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
  • पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
  • भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले.
  • भारत व पाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले.
  • जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.
  • ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
  • उर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजिर आंदोलन

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

बाह्य दुवे

  • 'फ्रंटलाईन' पत्रिकॆमधील लेखन
  • पाकिस्तानची जन्मकथा
  • BBC हिंदी (हिंदी भाषेत) https://www.bbc.com/hindi/resources/idt-sh/partition_timeline_hindi. 12-03-2018 रोजी पाहिले. ये कहानी 70 साल पहले की है, जब देश दो हिस्सों में बँट गया-- भारत और पाकिस्तान. विभाजन के इतिहास से जुड़ी कुछ अहम तारीख़ों पर एक नज़र. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)