"सदस्य:विजय लक्ष्मण थोरात/२०ऑगस्ट कार्यशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: रामभाऊ राजवाडे पारतत्र्याच्या काळात ब्रिटीश अधिकाऱ्यानी सो...
(काही फरक नाही)

१४:१२, २० ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

रामभाऊ राजवाडे  
   पारतत्र्याच्या काळात ब्रिटीश अधिकाऱ्यानी सोलापुरातील निरपराध जनतेबरोबर केलेल्या राक्षसी अत्याचाराला गोळीबाराला आपल्या कर्मयोगी साप्ताहिकातून तोंड फोडून त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत परिणामाची पर्वा न करता छापणारे रामचंद्र शंकर तथा रामभाऊ राजवाडे हे एक निभ्रीड संपादक थोर देशभक्त कुशल   संघटक, नामवंत मल्ल, पट्टीचे वक्ते, निपुण तबलावादक, हिंदूचे पुढारी आणि समंजस मुस्लीम नेत्याशी सलोख्याने संबध असणारे नेते होते. त्याचा जन्म सातारा जिल्ह्यातील वडूज गावी १८९१ सालातील ७ एप्रिलला झाला. शाळेत एक हुशार शिस्तप्रिय कुस्तीप्रीय आणि सत्यप्रिय विध्यार्थी म्हणून त्याची ख्याती होती. सोलापूर येथील नॉर्थकोट हायस्कूलमधून म्याट्रिक झाल्यावर काही वर्षे रेव्हेन्यू खात्यात नोकरी करत सरत टे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१७ ते २० अशी ३ वर्षे वकिली करून एक नामवंत वकील म्हणून त्यानी नाव मिळविलं.