"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०: ओळ २०:
*'''अर्का अभय''' - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
*'''अर्का अभय''' - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
*'''पुसा सावनी''' - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसीत झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.
*'''पुसा सावनी''' - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसीत झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.




==फायदे==
==फायदे==
ओळ ३७: ओळ ३५:


http://marathi.destatalk.com/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1/
http://marathi.destatalk.com/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1/

http://www.drbawasakartechnology.com/m-June2013-BhendiLagwad.html#.Wuh5wuhubrc


[[वर्ग:भाज्या]]
[[वर्ग:भाज्या]]

२०:२६, १ मे २०१८ ची आवृत्ती

भेंडी

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.भेंडीचे पिक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते. उन्‍हाळयात भाज्‍यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते. भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी-९०%,प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % आहेत.

भेंडी लागवड

भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.

हंगाम

भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीक टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावे.

हवामान

या पिकास उष्ण हवामान जास्त मानवते. २० अंश ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात फुलांची गळ होऊ शकते. तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

खत व पाणी

जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पिकाला मातीची भर द्यावी. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घ्यावेत. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.

काढणी

बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची काढणी करावी. एक दिवसाआड भेंडीची तोडणी करावी. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी.

जाती

  • अर्का अनामिका - आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसीत झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते . ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.
  • परभणी क्रांती - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
  • अर्का अभय - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
  • पुसा सावनी - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसीत झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.

फायदे

  • भेंडी सेवन केल्याने कँसर होत नाही
  • भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
  • डायबेटीज होण्याची शक्यता नसते
  • भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते
  • पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
  • हाड मजबूत होतात

संदर्भ

http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies

http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=cec12c80-d7d0-40c3-b1c9-2a0e14c7e2be

http://marathi.destatalk.com/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1/

http://www.drbawasakartechnology.com/m-June2013-BhendiLagwad.html#.Wuh5wuhubrc