"ईल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

डेन्मार्कमधील जीवशास्त्रज्ञ योहान्नेस श्मिट यांनी १६ वर्षे संशोधन करून यूरोपीय ईलच्या जीवनवृत्ताचा उलगडा केला आहे. यूरोपीय ईलची पैदास वसंतऋतूत सरगॅसो समुद्रात वेस्ट इंडिजच्या ईशान्येस होते. शेकडो किलोमीटरांचा प्रवास करून नदीतून हे मासे पैदास-क्षेत्रात जातात व अंडी घातल्यावर मरतात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या डिंभांना (डिंभ म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी पूर्वावस्था) लेप्टो-सेफॅलस म्हणतात. ते चपटे व पारदर्शक असून त्यांची लांबी सु. ६ मिमी. असते. येथून हे डिंभ गल्फ स्ट्रीम च्या साहाय्याने आइसलँड, यूरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्याचप्रमाणे भूमध्य समुद्रात जातात. किनाऱ्यावर पोहोचण्याच्या सुमारास ते तीन वर्षांचे आणि ७ – ८ सेंमी. लांब असतात.

या ठिकाणी त्यांचे रूपांतर होऊन शरीर दंडगोलाकार होते, पण ते पारदर्शकच असते. या अवस्थेला एल्व्हर किंवा काच-ईल म्हणतात. यानंतर वसंतऋतूत एल्व्हर नदीमुखातून नदीत शिरतात. यावेळी त्यांचे शरीर वर्णकित (रंगीत) होते आणि ते लहान ईल माशांसारखे दिसतात. नर नदीमुखाच्या जवळपासच्या टप्प्यातच राहतात, पण माद्या नदीत फार दूरवर जातात काही ओढे आणि तलावात शिरतात. या ठिकाणी त्यांची पूर्ण वाढ होते. त्यांचा रंग पिवळसर-करडा असतो. माद्या गोड्या पाण्यात ९–१९ वर्षे राहतात. या काळाच्या अखेरीस त्यांचा रंग रुपेरी होतो, डोळे मोठे होतात, त्या अन्न खात नाहीत आणि समुद्रातील पैदास-क्षेत्राकडे जाऊ लागतात. नर ७–१२ वर्षे गोड्या पाण्यात राहिल्यावर रुपेरी होतात आणि नंतर समुद्रात जातात.

१२:४८, १२ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात. यूरोपीय जातीचे नाव अँग्विला

वर्णन

अँग्विला आणि भारतीय जातीचे अँग्विला बेंगालेन्सिस असे आहे. भारतीय ईलचे मराठी नाव अहीर आहे. याचे शरीर सापासारखे असून लांबी १.५ सेंमी. पर्यंत असते. श्रोणि-पक्ष (ढुंगणावर असणारे पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त त्वचेच्या स्‍नायुमय घड्या) नसतात. बहुतेक जातींत लांब पृष्ठ-पक्ष आणि गुद-पक्ष शेपटाच्या टोकावर एकमेकांना मिळून एक अखंड पक्ष तयार होतो. शरीरावर खवले नसून त्वचा बुळबुळीत असते. ईल मांसाहारी आहे. ईल माशाचे जीवनवृत्त असामान्य आहे.

डेन्मार्कमधील जीवशास्त्रज्ञ योहान्नेस श्मिट यांनी १६ वर्षे संशोधन करून यूरोपीय ईलच्या जीवनवृत्ताचा उलगडा केला आहे. यूरोपीय ईलची पैदास वसंतऋतूत सरगॅसो समुद्रात वेस्ट इंडिजच्या ईशान्येस होते. शेकडो किलोमीटरांचा प्रवास करून नदीतून हे मासे पैदास-क्षेत्रात जातात व अंडी घातल्यावर मरतात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या डिंभांना (डिंभ म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी पूर्वावस्था) लेप्टो-सेफॅलस म्हणतात. ते चपटे व पारदर्शक असून त्यांची लांबी सु. ६ मिमी. असते. येथून हे डिंभ गल्फ स्ट्रीम च्या साहाय्याने आइसलँड, यूरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्याचप्रमाणे भूमध्य समुद्रात जातात. किनाऱ्यावर पोहोचण्याच्या सुमारास ते तीन वर्षांचे आणि ७ – ८ सेंमी. लांब असतात. या ठिकाणी त्यांचे रूपांतर होऊन शरीर दंडगोलाकार होते, पण ते पारदर्शकच असते. या अवस्थेला एल्व्हर किंवा काच-ईल म्हणतात. यानंतर वसंतऋतूत एल्व्हर नदीमुखातून नदीत शिरतात. यावेळी त्यांचे शरीर वर्णकित (रंगीत) होते आणि ते लहान ईल माशांसारखे दिसतात. नर नदीमुखाच्या जवळपासच्या टप्प्यातच राहतात, पण माद्या नदीत फार दूरवर जातात काही ओढे आणि तलावात शिरतात. या ठिकाणी त्यांची पूर्ण वाढ होते. त्यांचा रंग पिवळसर-करडा असतो. माद्या गोड्या पाण्यात ९–१९ वर्षे राहतात. या काळाच्या अखेरीस त्यांचा रंग रुपेरी होतो, डोळे मोठे होतात, त्या अन्न खात नाहीत आणि समुद्रातील पैदास-क्षेत्राकडे जाऊ लागतात. नर ७–१२ वर्षे गोड्या पाण्यात राहिल्यावर रुपेरी होतात आणि नंतर समुद्रात जातात.