"रेखांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पुर्व-पश्चिम अंशात्मक अंतर रेखांश य...
(काही फरक नाही)

०३:४१, २३ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती

पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पुर्व-पश्चिम अंशात्मक अंतर रेखांश या प्रमाणाने मोजले जाते.

रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय.

अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रिनीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला 'मुख्य रेखावृत्त' म्हटले जाते. या गृहीतानुसार एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानातून जाणाऱ्या पृथ्वीच्या व्यासाने 'मुख्य रेखावृत्ताशी' केलेला कोन होय. अर्थात मुख्य रेखावृत्ताचे रेखांश शुन्य (०) आहे.