"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १५: ओळ १५:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.ycmou.ac.in/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.ycmou.ac.in/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ]
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:भारतातील मुक्त विद्यापीठे]]
[[वर्ग:भारतातील मुक्त विद्यापीठे]]

२२:१९, २० जुलै २०१७ ची आवृत्ती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. ई. वायुनंदन हे सध्या (२०१७ साली) विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉ दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपल्या कल्‍पक दृष्‍टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम तयार केले. अशा शिक्षणाच्‍या संधी या विद्यापीठामुळे उपलब्‍ध झाल्या आहेत.

देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कुसमाग्रज यांनी लिहिले. कुसुमाग्रजांच्या नावाने येथे अध्यासन आहे. या अध्यासनातएफे तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठामार्फत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात.

कृषिविद्या शाखा

विद्यापीठातली अध्यासने

  • कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार, कथालेखन पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार देण्यात येतात. २०१६ साली छिदवाडा येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
  • वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणा्र्‍या पुणे येथील उषाताई वाघ यांना २०१४ सालचा श्रमसेवा पुरस्कार प्रदान झाला.
  • धुळ्याच्या समाजसेविका नजूबाई गावित यांनाही श्रमसेवा पुरस्कार मिळाला आहे.
  • कन्‍नड साहित्यिक डॉ. एच.एस. शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार (२०१७)
  • लातूरच्या मेनका धुमाळे यांना बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार (२०१७)

बाह्य दुवे