"महाबलीपुरम लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४: ओळ ४:


==भौगोलिक महत्व==
==भौगोलिक महत्व==
हे ठिकाण पल्लव वंशाच्या आधीपासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते.इ.स.पहिल्या व दुस-या शतकातील ग्रीक व रोमन ग्रंथात याचा मलंगी म्हणून उल्लेख आढळतो.
हे ठिकाण पल्लव वंशाच्या आधीपासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते.इ.स.पहिल्या व दुस-या शतकातील ग्रीक व रोमन ग्रंथात याचा मलंगी म्हणून उल्लेख आढळतो.तमिल काव्यातही या बंदराचा उल्लेख आहे.प्राचीन काळी त्याला मलंगे व कदलमललई ही नावे होती.


==सांस्कृतिक महत्व==
==सांस्कृतिक महत्व==

१३:०७, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती

प्रस्तावना

दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र.हे गाव मद्रासपासून ३५ मैलांवर समुद्रकिनारी वसलेले आहे. पुराण प्रसिद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपूरम हे नाव मिळाले.

भौगोलिक महत्व

हे ठिकाण पल्लव वंशाच्या आधीपासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते.इ.स.पहिल्या व दुस-या शतकातील ग्रीक व रोमन ग्रंथात याचा मलंगी म्हणून उल्लेख आढळतो.तमिल काव्यातही या बंदराचा उल्लेख आहे.प्राचीन काळी त्याला मलंगे व कदलमललई ही नावे होती.

सांस्कृतिक महत्व

पल्लव वंशाच्या राजवटीत इथे अनेक शिल्पे निर्माण झाली.अखंड दगडात खोदलेली मंदिरे हे महाबलीपूरमचे वैशिष्ट्य आहे. इथेच कृष्ण मंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे.या गुंफेत गोवर्धन धारी श्रीकृष्ण व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत.या गुंफेजवळ पंच पांडव रथ आहेत.दगडात कोरलेले एक तीन मजली मंदिर येथे आहे.या मंदिरासमोरच वराहमंडप आहे.त्यात वराहरूपी विष्णू पृथ्वीला समुद्रातून वर काढीत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे.[१] या गावात टेकडीवर एक शिव मंदिर आहे.त्याला ओलक्कनाथाचे मंदिर म्हणतात.ते दगडाचे बांधलेले असून इतके उंच आहे की पूर्वी ते दीपगृहाचे काम करीत असावे. चित्रे= पंच पांडव काही अंतरावर १०० फूट लांब व ३० फूट रुंद उंच अशा एका प्रचंड खडकावर कोरलेली अनेक चित्रे आहेत.नाग,नागीन, जटाधारी पुरुष,अर्जुन,हती, वाघ,सिंह,यक्ष ,गंधर्व,सूर्य, अप्सरा,यांची चित्रे कोरलेली आहेत.

चित्रदालन

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा