"गिरिजात्मज (लेण्याद्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४: ओळ २४:
File:लेण्याद्री.jpg
File:लेण्याद्री.jpg
</gallery>
</gallery>
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}

== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१०:२७, २५ मे २०१७ ची आवृत्ती

गिरिजात्मज (लेण्याद्री)लेणं

गिरिजात्मज (लेण्याद्री) हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. पुणे जिल्ह्यातील गणपतीचे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत, त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. .

देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले[१]

आख्यायिका

पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नाव मिळाले.

स्वरूप

गिरिजात्मज (लेण्याद्री)
गिरिजात्मज (लेण्याद्री)गुहा

पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.

सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे. या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाहीत. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.

या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते. पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून लेण्याद्री येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

  • http://www.marathimati.com/balmitra/stories/ganpati-stories/girijatmak-ganesh-sthapana/. Missing or empty |title= (सहाय्य)
अष्टविनायक
मोरेश्वरसिद्धिविनायकबल्लाळेश्वरवरदविनायकगिरिजात्मजचिंतामणीविघ्नहरमहागणपती