"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७: ओळ ३७:
* [[काका गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] (१९६४ ते १९६६)
* [[काका गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] (१९६४ ते १९६६)
* डॉ. [[धनंजयराव गाडगीळ]] (१९६६ ते १९६७)
* डॉ. [[धनंजयराव गाडगीळ]] (१९६६ ते १९६७)
* [[ह.वि. पाटसकर]] (१९६७ ते १९७०)
* [हरिभाऊ पाटसकर|ह.वि. पाटसकर]] (१९६७ ते १९७०)
* डॉ. [[बा.पां आपटे]] (१९७० ते १९७२)
* डॉ. [[बा.पां आपटे]] (१९७० ते १९७२)
* प्राचार्य डॉ. [[ग.स. महाजनी]] (१९७२ ते १९७५)
* प्राचार्य डॉ. [[ग.स. महाजनी]] (१९७२ ते १९७५)

१५:५७, २० मे २०१७ ची आवृत्ती

पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य यः क्रियावान् स पण्डितः
स्थापना इ.स. १९४८
विद्यार्थी १,७०,०००
संकेतस्थळ www.unipune.ac.in



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे.

मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

पुणे विद्यापीठात

  • ४६ शैक्षणिक विभाग आहेत.
  • ४७४ महाविद्यालये आणि
  • सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.

इतिहास

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू

नामविस्तार

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]

नामविस्तारानंतरही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.[२]

अध्यासने

पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.

विभाग आणि संशोधन केंद्रे

पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.

ग्रंथालय

जयकर ग्रंथालय

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ आयबीएन लोकमत http://www.ibnlokmat.tv/?p=104234. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.loksatta.com/pune-news/students-waiting-for-updated-certificates-1238117/

बाह्य दुवे