३५,२५४
संपादने
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
प्राचीन अवेस्ता ग्रंथाच्या स्वरुपाचे थोडक्यांत वर्णन केल्यानंतर त्यापैकीं हल्लीं किती भाग उरला आहे याकडे वळूं. पूर्वी शिल्लक असलेल्या ग्रंथांचे स्वरूप सांगितलें आहे त्यावरून प्राचीन अवेस्ता ग्रंथातील मुख्य व महत्त्वाचा भाग अद्यापिही शिल्लक आहे असें दिसतें. कारण २१ नस्कांपैकी वेंदीदाद व स्तोतयश्त व बकान यश्ताचा महत्वाचा भाग हें तीन नस्क संपूर्ण उपलब्ध आहेत. बक, हाधोक्त, विष्तास्त सास्त व हूस्पारम या चार नस्कांचा महत्त्वाचा भाग अद्यापि उपलब्ध असून त्याशिवाय इतर नस्कांमधील थोडा थोडा भाग उपलब्ध आहे. याशिवाय बाकींचे नष्ट नस्क अवेस्तन भाषेत उपलब्ध नसले तरी पहलवी भाषेत भाषांतराच्या रूपाने ते अस्तित्वांत आहेत व या भाषांतराच्या सहाय्याने त्यांतील मजकूर कळतोच.
==अवेस्तांतील विषय
हल्लीच्या उपलब्ध अवेस्ता ग्रंथाच्या अंतरंगाची माहिती ज्ञानकोश प्रस्तावना खंड, भाग ३, उत्तरभाग प्रकरण ८ पृष्ठे ९८-९९ यामध्यें दिलेली आहे. कालासंबंधीं वर दिलेल्या प्रकरणांतील १००-१०१ पाने पहा.
|