Jump to content

"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६,१०९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
 
प्राचीन अवेस्ता ग्रंथाच्या स्वरुपाचे थोडक्यांत वर्णन केल्यानंतर त्यापैकीं हल्लीं किती भाग उरला आहे याकडे वळूं. पूर्वी शिल्लक असलेल्या ग्रंथांचे स्वरूप सांगितलें आहे त्यावरून प्राचीन अवेस्ता ग्रंथातील मुख्य व महत्त्वाचा भाग अद्यापिही शिल्लक आहे असें दिसतें. कारण २१ नस्कांपैकी वेंदीदाद व स्तोतयश्त व बकान यश्ताचा महत्वाचा भाग हें तीन नस्क संपूर्ण उपलब्ध आहेत. बक, हाधोक्त, विष्तास्त सास्त व हूस्पारम या चार नस्कांचा महत्त्वाचा भाग अद्यापि उपलब्ध असून त्याशिवाय इतर नस्कांमधील थोडा थोडा भाग उपलब्ध आहे. याशिवाय बाकींचे नष्ट नस्क अवेस्तन भाषेत उपलब्ध नसले तरी पहलवी भाषेत भाषांतराच्या रूपाने ते अस्तित्वांत आहेत व या भाषांतराच्या सहाय्याने त्यांतील मजकूर कळतोच.
 
==अवेस्तांतील विषय, मांडणी व काळ==
हल्लीच्या उपलब्ध अवेस्ता ग्रंथाच्या अंतरंगाची माहिती ज्ञानकोश प्रस्तावना खंड, भाग ३, उत्तरभाग प्रकरण ८ पृष्ठे ९८-९९ यामध्यें दिलेली आहे. कालासंबंधीं वर दिलेल्या प्रकरणांतील १००-१०१ पाने पहा.
 
==अवेस्तांतील वृत्ते==
अवेस्तांतील वृत्तांचे निरीक्षण केल्यास अवेस्तांतील भाग कोणकोणत्या वेळी लिहिले गेले याचे अनुमान करता येते. अवेस्तांतील अगदी जुना जो भाग आहे तो छंदाबद्ध आहे. व त्यानंतर मागाहून लिहिण्यात आलेला भाग हा गद्य आहे असे दिसते. गाथा वाड्मय हा छंदोबद्ध भाग असून त्याचे याहि बाबतीत वैदिक ग्रंथांशी साम्य आहे. अवेस्तामधील छंदोबद्ध भाग म्हणजे गाथावाड्मय. त्याशिवाय दुसरा कोणता छंदोबद्ध भाग नाही अशी प्राचीनांची समजूत होती पण यूरोपीयन पंडितांनी गाथावाड्मयानंतरच्या वाड्मयांतहि मधून मधून छंदोबद्ध भाग दृष्टीस पडतात असे सिद्ध केले आहे. अवेस्तांतील पद्यवाड्मय हे अष्टाक्षरी वृत्तांत लिहिलेले आढळते. याशिवाय इतर वृत्त वापरलेले क्वचितच आढळून येते.
 
==अवेस्ताची भाषा==
अवेस्ता ज्या भाषेत लिहिला गेला त्या भातिचे अवेस्तन नांव आहे. इंडोजर्मानिक भाषासमूहाच्या इराणी शाखेची ही भाषा असून तिचे [[संस्कृत]]शी विलक्षण साम्या आहे; व हे अवेस्ता ग्रंथाच्या प्रामाण्यनिश्चयाचे एक बलवत्तर साधन झाले आहे. ध्वनिशास्त्रदृष्ट्या अवेस्तन भाषेंतील व संस्कृत भाषेतील स्वरांमध्ये पुष्कळ साम्य आहे. ई व ओ या स्वरांचे अवेस्तन भाषेत पुष्कळ प्रकार होतात तसे संस्कृतमध्ये होत नाहीत. शब्दाच्या शेवटचे स्वर ओ खेरीजकरून सर्व ऱ्हस्व आहेत. संस्कृतमध्ये तसा प्रकार नाही. अवेस्तन भाषेतील काही व्यंजने संस्कृत व्यंजनांशी साम्य दाखवितात पण बऱ्याच व्यंजनांचे संस्कृत व्यंजनांशी ध्वनिसाम्य आहे. संस्कृत 'स' चे अवेस्तांत 'ह' हे रूप होते. अशा रीतीने संस्कृत व अवेस्तन भाषांमध्ये पुष्कळच साम्य असल्यामुळे अवेस्तन शब्दप्रयोगांचे संस्कृतांत सहज रूपांतर करतां येते. वैदिक संस्कृत भाषेप्रमाणेच अवेस्तन भाषेंतहि प्रत्ययांची समृद्धि आहे. वाक्यरचनेच्या बाबतींत, संस्कृतमध्ये व अवेस्तन भाषेमध्ये थोडा फार महत्त्वाचा फरक आढळून येतो.
 
अवेस्ता ग्रंथांत दोन पोटभाषांचे अस्तित्व दृग्गोच्चर होते. एक गाथांची जुनी भाषा व दुसरी नंतरच्या वाड्मयांत आढळून येणारी भाषा. पहिलीला गाथाअवेस्तन भाषा असे नाव आहे व दुसरीचे कनिष्ठ अवेस्तन नाव आहे. गाथाअवेस्तन भाषा आणि कनिष्ठ अवेस्तन भाषा या दोन भाषांमधील फरक वैदिकसंस्कृत व अभिजातसंस्कृत यांमधील फरकाप्रमाणे आहे. गाथांची भाषा फार शुद्ध असून वाक्यरचनाहि पण तितकीच शुद्ध असते. शब्दाच्या शेवटचा स्वर दीर्घ करण्यांत येतो. कनिष्ठ अवेस्तनभाषा मिश्र आहे. अपभ्रष्ट शब्द तीत बरेच येतात.
 
== हेही पहा==
३५,५९३

संपादने