"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:


==मूत्रपिंड दिवस==
==मूत्रपिंड दिवस==
सन २००६पासून, १३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>
सन २००६पासून, मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>


==पुस्तक==
==पुस्तक==

१८:१७, १३ मार्च २०१७ ची आवृत्ती

माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.

कार्य

फुफुसांप्रमाणेच मूत्रपिंडे देखील अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात.[१] या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात.

शरीरातले आम्लअल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मूत्रपिंडे करतात..[२]

मूत्रपिंडतज्‍ज्ञ डॉक्टरला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात.

मूत्रपिंड रोपण

दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या सार्‍यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो. मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्चरक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.

मूत्रपिंड दिवस

सन २००६पासून, मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो.[३]

पुस्तक

मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-

  • डायलिसिस (मदनराव काळे)
  • डायलिसिसवर जगताना (मीना कुर्लेकर)
  • तुमची किडनी आणि तुम्ही (डॉ. किशोरी पै)
  • माझा मृत्युंजय (प्रकाश निकुंभ)
  • सुरक्षा किडणीची (डॉ.ज्योत्स्ना झोपे आणि डॉ.संजय पंड्या)
  • हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी (पद्मजा फाटक)

संकेतस्थळ

संदर्भ

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1
  2. ^ www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm
  3. ^ http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24