"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६१९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[इ.स. २००६]] ते [[इ.स. २०११]] हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. [[इ.स. २००६]] च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत [[सिंगूर]] येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटाने आंदोलन केले. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर [[इ.स. २००८]] मध्ये टाटांनी सिंगूरमधून माघार घेतली. शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेले. तर पोलिसी बळाच्या अतिवापराने डाव्यांना लोकांपासून तोडले. त्यानंतर [[पंचायत]], [[महापालिका]], [[विधानसभा]], [[लोकसभा]], यांच्या पोटनिवडणुकींत ममतांना वाढते यश मिळत गेले. [[इ.स. २००९]] मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.
 
===२०११ ची विधानसभा निवडणूकनिवडणूका===
कविमनाच्या ममतादीदींनी या[[पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०११|२०११ विधानसभा निवडणुकीसाठी]] "मां माटी, माणूश' आणि "बदला नही बदलाव चाहिये' अशा दोन घोषणा स्वतः तयार केल्या. या घोषणांची जनमताचा ठाव घेतला. प्रत्येक सभेत त्या जणू दुर्गेचेच रूप धारण करीत. डाव्या नेत्यांवर त्या त्वेषाने तुटून पडत. एक महिला डाव्यांना आव्हान देते याचे सामान्यांना मोठे अप्रूप वाटे. केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक एक-दीड किलोमीटर दुतर्फा गर्दी करीत. ज्योती बसू यांच्यानंतर सामान्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या, त्यांची नस ओळखणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. 'मां, माटी, माणूश...' या घोषणेने सामान्य बंगालींना आपलसे करत ममता बॅनर्जीनी ३४ वर्षांची पश्चिम बंगालमधली कम्युनिस्टांची 'लालसत्ता' उलथून डाव्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चारीमुंड्या चीत केले. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय पटलावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करत केंदीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली. दिल्लीत जाऊनही बंगालशी असलेली नाळ त्यांनी कायम राखली. कॉटनची पांढरी सुती कमी किमतीची साडी व खांद्याला शबनम बॆग लावून जनतेत मिसळणाऱ्या ममता बॅनर्जी कोलकात्याच्या कालीघाट परिसरातील पूर्वीच्याच छोट्या घरात रहातात. अशा साधेपणातून ममतांनी बंगालच्या सामान्य माणसांशी स्वतःला जोडून ठेवले.
 
[[पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६|२०१६ विधानसभा निवडणुकीमध्ये]] ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने पुन्हा झंझावाती प्रदर्शन दिले व बहुमत आणि पश्चिम बंगालमधील सत्ता राखली.
 
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
२८,६५२

संपादने

दिक्चालन यादी