"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२७ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(काम चालू साचा काढला)
''हा लेख बीड शहराविषयी आहे. [[बीड जिल्हा]]च्या माहितीसाठी [[बीड जिल्हा|येथे]] टिचकी द्या''
 
'''बीड''' (किंवा भीर) ('''Bhir''') हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक शहर आहे, आणि [[महाराष्ट्रातील जिल्हे|३६ जिल्ह्यांपैकी]] एक असलेल्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या [[मराठवाडा]] विभागात मोडतो.
 
==वैशिष्ट्ये==
 
==इतिहास==
बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग '''Bhir''' असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.
 
बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणार्‍या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
 
==किल्ले मैदान, लक्ष्मीबाग==
बीडचा तुरुंग [[इ.स. १९३४]] सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकार्‍यांच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.
 
==शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने==
’सटवाई’ ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे. माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच मंदिरामुळे हा सर्व भाग 'सटवाई मैदान' म्हणून ओळखला जात असे. नंतर 'बारादरी' व आज 'माळीवेस' या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही. ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या 'बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास' या ग्रंथात या वेशीवरील शिलालेख आला आहे.
 
शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने [[[इ.स.१८९०मध्ये १८९०]] मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.
 
==बशीरगंज==
बशीरगंज हे नाव या ठिकाणी [[इ.स. १९०५]] मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो.
 
==गाजीपुरा==
३९,०३०

संपादने

दिक्चालन यादी