"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय [[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये [[इंडिया टाइम्स]]ने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. [[लोकमान्य टिळक]] समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय [[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली [[लोकमान्य टिळक]] व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये [[इंडिया टाइम्स]]ने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.


एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.

००:३५, २३ जून २०१६ ची आवृत्ती

फर्गसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.

एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.

येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

फर्गुसन महाविद्यालयाचा इतिहास

फर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. . फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.

हे सुद्धा पहा