३२,१२०
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो (→top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या) |
||
न्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग [[युरोप]]ीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर [[जर्मन साम्राज्य]]ाचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनची]] सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता [[ऑस्ट्रेलिया]]कडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव ''टेरिटोरी ऑफ पापुआ'' असे ठेवले गेले. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धादरम्यान]] ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून ''टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी'' नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.
== बाह्य दुवे ==
|