"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३९: ओळ ३९:


== माध्यमांतर ==
== माध्यमांतर ==
नटसम्राट या नाटकावरून [[महेश मांजरेकर ]] यांनी [[मराठी]]भाषेत चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात [[नाना पाटेकर]] मुख्य भूमिकेत आहेत.
नटसम्राट या नाटकावरून [[महेश मांजरेकर]] [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]] चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात [[अमिताभ बच्चन]] मुख्य भूमिका करणार असल्याचे वृत्त आहे<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13168693.cms | शीर्षक = 'नटसम्राट' साकारण्यास अमिताभ 'तय्यार' | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | लेखक = झा, सुभाष के. | दिनांक = १६ मे, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. जुलै, इ.स. २०१२मध्ये चित्रीकरणास सुरुवात होईल असा कयास आहे.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१३:०६, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

नटसम्राट
लेखन विष्णू वामन शिरवाडकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. १९७०
कलाकार श्रीराम लागू

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

कलाकार

या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.

नटसम्राटचे सलग आठ प्रयोग

या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडकेफाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती.

माध्यमांतर

नटसम्राट या नाटकावरून महेश मांजरेकर यांनी मराठीभाषेत चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत.

संदर्भ